देशातील तिसरी मोठी टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea ने आपल्या वापरकर्त्यांसाठी 4 नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक लाँच केले आहेत. हे प्लॅन पोस्टपेड ग्राहकांसाठी सादर केले गेले आहेत. जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही Vi ने लाँच केलेले हे नवीन पॅक घेऊ शकता. यासह कंपनी अमर्यादित डेटा आणि कॉलिंगसारख्या सुविधा देत आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
VI चा 599 रुपयांचा इंटरनॅशन रोमिंग पॅक
नव्या इंटरनॅशल रोमिंग पॅकची सुरुवातीची किमंत 599 रुपये आहे. हा प्लॅन एक दिवस म्हणजेच 24 तासांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अनलिमिटेड डेटा, इनकमिंग कॉलिंग आणि आउटगोइंग कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. जर तुमची इंटरनॅशनल ट्रिप कामानिमित्त केवळ 1-दिवसीय असेल, तर हा प्लॅन उत्तम आहे.
2,999 रुपयांचा प्लॅन 7 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा, इनकमिंग कॉलिंग आणि आउटगोइंग कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
VI चा 3,999 रुपयांचा इंटरनॅशन रोमिंग पॅक
3,999 रुपयांच्या तिसऱ्या पॅकमध्ये वापरकर्त्यांना 10 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या पॅकमध्ये वापरकर्त्यांना 10 दिवसांसाठी अमर्यादित डेटा, इनकमिंग कॉलिंग आणि आउटगोइंग कॉलिंग सुविधा मिळणार आहे.
VI चा 4,499 रुपयांचा इंटरनॅशन रोमिंग पॅक
4,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण 14 दिवसांची वैधता युजर्सना मिळेल. वरील सर्व प्लॅन्सप्रमाणे या प्लॅनसह देखील युजर्सना अमर्यादित डेटा, इनकमिंग कॉलिंग आणि आउटगोइंग कॉलिंगची सुविधा मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile