भारीच की ! Vodafone-Idea निवडक युजर्सना मोफत देतेय 6GB डेटा, तुमचे नाव आहे का यादीत ?

HIGHLIGHTS

नुकतेच कंपनीने दोन स्वस्त प्लॅन्सची वैधता कमी केली.

लेटेस्ट ऑफरसह कंपनी संपूर्ण 6GB डेटा अगदी मोफत देत आहे.

मात्र, ही ऑफर केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

भारीच की ! Vodafone-Idea निवडक युजर्सना मोफत देतेय 6GB डेटा, तुमचे नाव आहे का यादीत ?

सध्या Vodafone-Idea कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहत आहे. नुकतेच कंपनीने दोन स्वस्त प्लॅन्सची वैधता कमी केली आहे. तर आता कंपनी आपल्या युजर्ससाठी फ्री डेटा ऑफर घेऊन आली आहे. लेटेस्ट ऑफरसह कंपनी संपूर्ण 6GB डेटा अगदी मोफत देत आहे. मात्र, लक्षात घ्या की ही ऑफर सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही. वाचा सविस्तर- 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Vodafone-Idea 6GB डेटा ऑफर 

Vodafone Idea कंपनीने त्यांच्या Hungama Gold ग्राहकांसाठी 6GB डेटाची ही ऑफर सादर केली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा टेलिकॉम कंपनीचा Hungama music सब्सक्रिप्शन प्लॅन आहे. या प्लॅनचा लाभ VI ऍपद्वारे मिळतो. थोडक्यात नव्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी हंगामा गोल्ड रिचार्जवर यूजर्सना 6GB डेटा मोफत देत ​​आहे. 

Hungama Gold सबस्क्रिप्शन प्लॅन 

Hungama Gold म्युझिक प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन युजर्ससाठी तीन महिन्यांच्या वैधतेसह येईल. मात्र, लक्षात घ्या की, प्लॅनसह मोफत 6GB डेटा 3 महिन्यांसाठी उपलब्ध होणार नाही. युजर्सना केवळ 15 दिवसांसाठी डेटा लाभ घेऊ शकतात. Vi च्या हंगामा गोल्ड सबस्क्रिप्शन प्लॅनची ​​किंमत 108 रुपये आहे.

हंगामा गोल्ड सबस्क्रिप्शन अंतर्गत युजर्स ऑफलाइन ऐकण्यासाठी गाणी मोफत डाउनलोड करू शकतात. तसेच, त्यांना प्लॅटफॉर्मवर ऍड-फ्री म्युझिकचा एक्सपेरियन्स घेता येणार आहे. त्याबरोबरच, कंपनी आपल्या संगीत आणि पॉडकास्ट प्रेमी युजर्ससाठी हंगामा गोल्डची मोफत सदस्यता देखील देते. मात्र, फ्री ट्रायल संपल्यावर यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo