Vodafone Idea VI भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या नवनवीन प्लॅन्स आणि ऑफर्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. होय, अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी VI सतत नवीन प्लॅन्स आणि ऑफर जारी करत असते. आता VI ने आपल्या विद्यमान डेटा पॅकसह एक उत्तम ऑफर दिली आहे. या डेटा पॅकद्वारे कंपनी वापरकर्त्यांना नेहमीच्या बेनिफिट्सव्यतिरिक्त बोनस डेटा देत आहे. तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेऊ इच्छित असाल तर, या प्लॅनची किंमत आणि मिळणाऱ्या एक्सट्रा डेटाबद्दल जाणून घेऊयात.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Vodafone Idea च्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 181 रुपये आहे. हा कंपनीचा डेटा पॅक आहे, जो केवळ वापरकर्त्यांच्या अतिरिक्त डेटाच्या गरजा पूर्ण करतो. म्हणजेच, या डेटा पॅकचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता असते. जर तुम्हाला विद्यमान बेस प्लॅनमध्ये पुरेसा डेटा मिळत नसेल, तर तुम्ही VI चा हा डेटा पॅक खरेदी करू शकता.
आता 181 रुपयांच्या डेटा पॅकबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सला 30 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1GB डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनसह तुम्हाला एकूण 30GB डेटाचा ऍक्सेस मिळेल. याशिवाय, कंपनी नवीनतम ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना बोनस डेटा देखील ऑफर करत आहे.
181 रुपयांच्या प्लॅनसह ऑफर उपलब्ध
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 0.5GB अतिरिक्त डेटा स्वतंत्रपणे मिळेल. 0.5GB डेटानुसार, हा प्लॅन तुम्हाला 20 दिवसांत एकूण 15GB डेटा मोफत देईल. मात्र, लक्षात घ्या की, Vodafone Idea VI ची ही ऑफर प्रत्येकासाठी उपलब्ध नाही. केवळ VI App आणि वेबसाइट वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही इतर कोणत्याही App द्वारे रिचार्ज केला तर, तुम्हाला हा बोनस डेटा लाभ मिळणार नाही.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile