HIGHLIGHTS
Vodafone-Idea चा 107 रुपयांचा प्लॅन
हा एक टॉक टाइम प्लॅन आहे.
मात्र, या प्लॅनमध्ये तुम्हाला इतरही फायदे मिळतील.
आजकाल सर्व टेलिकॉम कंपन्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी त्यांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहेत. Vodafone Idea देखील आपल्या वापरकर्त्यांना स्वस्त प्लॅनची सुविधा देत आहे. जर तुम्ही Vodafone Idea चे यूजर असाल तर आज आम्ही तुम्हाला Vi च्या अशा स्वस्त प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत खूप काही मिळत आहे. Vi च्या 107 रुपयांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
Surveyहे सुद्धा वाचा : स्मार्ट पार्टनरसाठी गिफ्ट हवंय ? 'या' 5 गॅजेट्ससह तुमचा Valentines Day बनवा स्पेशल
हा एक टॉक टाइम प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 107 रुपयांमध्ये टॉकटाइम देखील देण्यात आला आहे. यामध्ये टॉकटाइम व्यतिरिक्त तुम्हाला 200MB डेटा मोफत मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला आउटगोइंग मॅसेजची सुविधा मिळणार नाही.
याशिवाय, तर तुम्हाला व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति सेकंद 2.5 पैसे द्यावे लागतील. जर तुम्हाला हा डेटा कमी वाटत असेल तर तुम्ही या प्लॅनमध्येच दुसरा डेटा प्लॅन मर्ज करून त्याचा फायदा घेऊ शकता.
Airtel आपल्या यूजर्सना 128 रुपयांचा प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये 30 दिवसांची वैधता दिली जाते. हा एक रेट कटर प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला लोकल आणि STD कॉलसाठी प्रति सेकंद 2.5 पैसे मोजावे लागतील. जर तुम्हाला राष्ट्रीय व्हिडिओ कॉलचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रति सेकंद 5 पैसे शुल्क द्यावे लागेल. डेटासाठी 50 पैसे प्रति एमबी आणि लोकल SMS साठी 1 रुपये शुल्क आकारले जाईल. STD कॉलिंगसाठी 1.5 रुपये आणि आयएसडी कॉलिंगसाठी 5 रुपये आकारले जातील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile