‘चूज युअर नंबर’ सेवेसह दिल्ली आणि एनसीआरमध्ये प्रीपेड ग्राहक आपले लकी नंबर, कार नोंदणी नंबर, जन्मतारीख, वर्धापन दिन किंवा इतर कोणत्याही आवडीच्या नंंबरवर आपला मोबाईल नंबर निवडू शकता.
दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी वोडाफोनने आपली एक नवीन सुविधा ‘चूज युअर नंबर’ लाँच केला आहे. कंपनीने ह्या सुविधेला प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहक दोघांसाठी सादर केले आहे. कंपनीने शुक्रवारी ह्याची घोषणा केली.
Survey
✅ Thank you for completing the survey!
‘चूज युअर नंबर’ सेवेसह दिल्ली आणि एनसीआरमध्ये प्रीपेड ग्राहक आपले लकी नंबर, कार नोंदणी नंबर, जन्मतारीख, वर्धापन दिन किंवा इतर कोणत्याही आवडीच्या नंंबरवर आपला मोबाईल नंबर निवडू शकता.
वोडाफोन इंडियाचे वाणिज्य प्रमुख (दिल्ली आणि एनसीआर) अपूर्व मेहरोत्रा ह्याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, “चूज युअर नंबर ऑफर ग्राहकांना त्यांच्या नंबरमध्ये स्वातंत्र्य देण्यासाठी सादर केली आहे. आपल्या ग्राहक परीक्षणानुसार, आम्हाला असे दिसून आले की, मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या आयुष्यातील काही खास घटनांशी संबंधित मोबाईल नंबर ठेवण्यात रुची आहे.”
त्याचबरोबर ते असेही म्हणाले की, ‘चूज युअर नंबर’ सेवा पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांना आपल्या आवडीचे नवीन वोडाफोन नंबर मिळवण्यासाठी सक्षम बनवेल.
नवीन वोडाफोन प्रीपेड कनेक्शनच्या खरेदीसाठी इच्छुक ग्राहक आपल्या आवडीच्या नंबरांसाठी ५२ स्टोअर्स,२१२ छोटे स्टोअर्स आणि ४०,००० मल्टी ब्रँड आऊटलेट्समध्ये (MBO) कुठेही ह्यासंबंधी संपर्क करु शकता.