आता क्षणार्धात अॅक्टिवेट होणार आपले वोडाफोन आणि एअरटेल सिम

आता क्षणार्धात अॅक्टिवेट होणार आपले वोडाफोन आणि एअरटेल सिम
HIGHLIGHTS

आता आपण आपल्या आधारकार्डद्वारे क्षणार्धात आपले सिम सक्रिय करु शकता. एअरटेल आणि वोडाफोनप्रमाणे आयडिया सेल्युलरसुद्धा ह्यासारखी योजना बनवत आहे.

वोडाफोनसह एअरटेलने अशी घोषणा केली आहे की, ह्या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर्सचे सिम KFC डॉक्यूमेंटच्या माध्यमातून केवळ आधारकार्डाद्वारे एक्टिवेट केले जाईल. त्याचबरोबर ह्याच प्रकारची स्कीम आता आयडिया सेल्युलरसुद्धा आणण्याची योजना बनवत आहे. आणि लवकरच आयडिया सिमसुद्धा आधारकार्डच्या माध्यमातून एक्टिवेट होने सुरु होईल. ह्याआधी आधारकार्डच्या माध्यमातून आपले सिम एक्टिवेट होत नव्हते, मात्र आता वोडाफोन आणि एअरटेलने उचलले हे शिवधनुष्य खूपच महत्त्वाचे मानले जात आहे.

वोडाफोनद्वारे ह्या स्कीमची घोषणा करताना वोडाफोनकडून कमर्शियल वोडाफोन इंडियाचे डायरेक्टर संदीप कटारिया यांनी सांगितले आहे की, “आम्ही आमच्या यूजर्सला एक नवीन योजना प्रदान करण्याच्या पूर्ण तयारीत आहोत. आता यूजर्सच्या आधारकार्डच्या माध्यमातून आपल्याला त्यांचे सिम त्वरित एक्टिवेट करता येईल. ही प्रक्रिया पेपरशिवाय होणारी आहे, जी e-KYC च्या माध्यमातून केली जाईल. “

हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
 

त्याचबरोबर ते पुढे असेही म्हणाले की, २४ ऑगस्टपासून देशातील ब-याच भागात ही सेवा सुरु केली जाईल. ह्याला e-KYC च्या माध्यमातून नवीन सिम एक्टिवेशनमध्ये त्याला लागणारा वेळ खूप कमी होईल.
 

हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…
 

त्याचबरोबर वोडाफोननेही ह्यासाठी एक विशेष अॅप बनवला आहे. ज्याच्या माध्यमातून रिटेलर काही वेळात e-KYC च्या साहाय्याने सिम एक्टिवेट केले जाईल.
 

एअरटेलने ही घोषणा केली होती, की सॅमसंग गॅलेक्सी J सीरिज स्मार्टफोन्ससह 10GB 4G डाटा केवळ 1GB च्या किंमतीत देईल.
 

हेदेखील वाचा – रिलायन्स Jio प्रीव्ह्यू ऑफर आता सॅमसंग, LG 4G स्मार्टफोन्ससाठीही झाली उपलब्ध
हेदेखील वाचा – मुंबईच्या ७ रेल्वे स्टेशन्सवर सुरु झाली मोफत वायफाय सेवा

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo