Vodafone Idea कडे OTT बेनिफिट्ससह येणारे भरपूर डेटा व्हाउचर आहे. कंपनीच्या अशा परवडणाऱ्या प्लॅनमध्ये तीन प्लॅन्स समाविष्ट आहेत. या प्लॅन्सची किंमत 698 रुपये, 169 रुपये आणि 82 रुपये आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, या डेटा व्हाउचरबद्दल माहिती देणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बेस प्लॅनवर अतिरिक्त डेटाची आवश्यकता असताना रिचार्ज या व्हाउचर्ससह रिचार्ज करू शकत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे 4G डेटा व्हाउचर आहेत, जे वापरकर्त्यांना हाय-स्पीड डेटा देतात.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Vodafone Idea Vi Plan
Vodafone Idea इतर अनेक OTT बंडल प्रीपेड प्लॅन्स देखील ऑफर करते, परंतु ते डेटा व्हाउचर नाहीत. याव्यतिरिक्त, तुम्ही Vi कडून डेटा व्हाउचर देखील खरेदी करू शकता, जे OTT प्लॅन्ससह येतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात प्लॅन्सची यादी-
Vodafone Idea चा 82 रुपयांचा प्लॅन हा या यादीतील स्वस्त प्लॅन आहे. हा प्लॅन 4GB डेटासह येतो. प्लॅनमध्ये 4GB डेटा 14 दिवसांसाठी उपलब्ध आहे. त्यासोबतच, हे डेटा व्हाउचर 28 दिवसांसाठी SonyLIV मोबाइल गेमिंगचे ऍक्सेस देखील देते. लक्षात घ्या की, वैधतेदरम्यान न वापरलेला डेटा 14 दिवसांनंतर कालबाह्य होईल.
Vodafone Idea चा 169 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea चा 169 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधतेदरम्यान 8GB डेटाचा ऍक्सेस मिळतो. या व्यतिरिक्त, हा प्लॅन Disney+Hotstar मोबाईल 3 महिन्यांसाठी ऑफर करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, Disney+ Hotstar Mobile सह, तुम्ही तुमच्या फोनवर 720p रिझोल्यूशनवर जाहिरातींसह कंटेंट पाहू शकता.
#Vi disney plus hotstar plan
Vodafone Idea चा 698 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea च्या 698 रुपयांच्या प्लॅनदेखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधतेदरम्यान 10GB डेटा मिळतो. मात्र, यासह वापरकर्त्यांना 1 वर्षासाठी SonyLIV मोबाइलचे ऍक्सेस देखील मिळेल. Sony Liv मोबाइल सबस्क्रिप्शनसह, वापरकर्ते त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर त्यांची आवडते शोज आणि चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile