Valentines day ला VI ची जबरदस्त ऑफर, आज रिचार्ज केल्यास यूजर्सला मिळतोय फ्री डेटा

Valentines day ला VI ची जबरदस्त ऑफर, आज रिचार्ज केल्यास यूजर्सला मिळतोय फ्री डेटा
HIGHLIGHTS

VI च्या ग्राहकांसाठी खास व्हॅलेंटाईन डे ऑफर

या ऑफरचा लाभ केवळ आज रिचार्ज केल्यास मिळेल.

युजर्सना मिळेल 5 GB अतिरिक्त डेटा

आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून या दिवसाला खास बनवण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही यूजर्ससाठी अनेक उत्तम ऑफर्स देत आहेत. Vi वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. मात्र, ही Vi ऑफर केवळ आजपुरताच मर्यादित आहे. 

हे सुद्धा वाचा : एका वर्षाच्या वैधतेसह येणारा BSNLचा स्वस्त प्लॅन, मिळेल तब्बल 600GB डेटा

बेनिफिट्स : 

जर तुमच्या जोडीदाराकडे Vodafone Idea कंपनीचा मोबाईल नंबर असेल, तर तुम्ही तुमच्या खास प्रिय व्यक्तीचा नंबर रिचार्ज करून व्हॅलेंटाईनवर अतिरिक्त डेटाचा लाभ भेट देऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की या Vi ऑफरसह, 299 रुपये आणि त्याहून अधिकच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 5 GB अतिरिक्त डेटा कंपनीकडून मोफत दिला जात आहे. हा अतिरिक्त डेटा केवळ 28 दिवसांच्या वैधतेसह येईल.

याबरोबरच, जर एखाद्या वापरकर्त्याने 199 रुपयांपासून 299 रुपयांपर्यंतच्या कोणत्याही प्लॅनमधून रिचार्ज केले तर त्यांना कंपनीकडून 2 GB अतिरिक्त डेटा दिला जाईल आणि या डेटाची वैधता 28 दिवस असेल.

'अशा'प्रकारे ऑफरचा लाभ घ्या

आम्ही तुम्हाला सांगतो की व्होडाफोन आयडियाची ही ऑफर खूप छान आहे आणि तुम्हालाही या संधीचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला आज 14 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीच्या Vi ऍपद्वारे रिचार्ज केल्यावरच या ऑफरचा लाभ मिळेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo