Vi च्या ‘या’ प्लॅनमध्ये दीर्घकालीन वैधतेसह दररोज 1.5GB डेटा, जाणून घ्या किंमत

HIGHLIGHTS

Vi प्लॅनमध्ये दररोज डेटासह 50GB डेटा मोफत मिळतो.

रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत मोफत डेटा स्वतंत्रपणे उपलब्ध आहे.

सोमवार ते शुक्रवार वीकेंडमध्ये उर्वरित डेटा वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Vi च्या ‘या’ प्लॅनमध्ये दीर्घकालीन वैधतेसह दररोज 1.5GB डेटा, जाणून घ्या किंमत

Vodafone Idea (Vi) ही दूरसंचार कंपनी भारतातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. Vi च्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे वैधता प्लॅन मिळतात. जर तुम्ही 84 दिवस ते 365 दिवस वैधता प्लॅन शोधत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला Vi कंपनीच्या 180 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Realmeचा नवीन फोन भारतात लाँच, परंतु 'या' फिचरच्या अभावामुळे होईल निराशा

Vi कंपनीच्या या प्लॅनची ​​विशेषता केवळ 180 दिवसांच्या वैधतेपुरता मर्यादित नाही. यासोबतच कंपनी या प्लॅनमध्ये युजर्सना अनेक उत्तम फायदे देखील देते. यात दैनंदिन डेटासह 50 GB मोफत अतिरिक्त डेटाचाही समावेश आहे. 

Vi चा 1,449 रुपयांचा प्लॅन 

Vi कंपनीच्या या प्लॅनमध्ये युजर्सना 180 दिवसांच्या वैधतेनुसार सर्व फायदे मिळतात. याशिवाय प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. हा प्लॅन वापरकर्त्यांना एकूण 270GB देतो. त्याबरोबरच, हा प्लॅन सक्रिय केल्यानंतर, वापरकर्त्यांना 50GB डेटा पूर्णपणे विनामूल्य दिला जातो. त्यानुसार, युजर्सना प्लॅनमध्ये एकूण 320GB डेटा मिळतो. इतर प्लॅन्सप्रमाणे, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMSची सुविधा देखील समाविष्ट आहे.

 अतिरिक्त फायद्यांमध्ये, या प्लॅनमध्ये ग्राहकांना नाईट डेटा आणि वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जाते. नाईट डेटा बेनिफिट अंतर्गत, ग्राहक 12 ते सकाळी 6 या वेळेत अमर्यादित डेटा वापरू शकतो. याशिवाय, वीकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिटमध्ये युजर्सना सोमवार ते शुक्रवार शनिवार आणि रविवारी उर्वरित डेटा वापरता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo