WFH साठी VIचे तीन जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स, 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध

WFH साठी VIचे तीन जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स, 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध
HIGHLIGHTS

WFH साठी VI चे तीन आकर्षक डेटा प्लॅन्स.

सुरुवातीच्या प्लॅनची किंमत 319 रुपये.

तिन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध.

लॉकडाउन पासून घरून काम करण्याचे म्हणजेच WFH हे एक नवीन वर्क मॉडेल तयार झाले आहे. मात्र, यासाठी तुमच्याकडे जास्त प्रमाणात इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक आहे. काम संपण्यापूर्वीच जर डेटा संपला तर  तयार होते.  काम संपण्यापूर्वी डेटा संपला तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला Vodafone Ideaच्‍या प्रीपेड प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, जे घरून काम करण्‍यासाठी उत्तम आहेत. चला तर जाणून घेऊयात या प्लॅन्सबद्दल सविस्तर… 

 VI चा 319 रुपयांचा प्लॅन 

VI 31 दिवसांच्या वैधतेसह 319 रुपयांचा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 2GB डेटासह 100 SMS मिळतात. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 62GB डेटा मिळतो. एवढेच नाही, Vodafone Idea आपल्या वापरकर्त्यांना Binge All Night, Weekend Data Rollover, Vi Movie आणि TV क्लासिक ऍक्सेससह अनेक सुविधा देते. 

हे सुद्धा वाचा: 144Hz डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंगसह येईल Xiaomi Pad 6 सिरीज, वाचा डिटेल्स

VI चा 539 रुपयांचा प्लॅन  

VI 539 रुपयांचा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा ऑफर करतो. या प्लॅन अंतर्गत, वापरकर्त्यांना अमर्यादित कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 112GB डेटा मिळतो. याशिवाय वापरकर्त्यांना Binge ऑल नाईट बेनिफिट देखील मिळेल. म्हणजेच तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत कोणत्याही मर्यादेशिवाय इंटरनेट डेटा वापरता येईल. तसेच, वापरकर्त्यांना कंपनीकडून वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईट ऑफर देखील मिळतात. 

 VI चा 839 रुपयांचा प्लॅन

 Vodafone Idea द्वारे ऑफर केलेल्या 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा मिळेल. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 168GB डेटा मिळतो. या प्लॅन अंतर्गत, युजर्सना दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS बेनिफिट मिळेल. या प्लॅनमध्ये बिंग ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट हे बेनिफिट देखील ऑफर केले जातात. या शिवाय, दररोजचा डेटा वापरल्यानंतर, डेटा स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. तसेच, दररोज 100 SMS मर्यादेनंतर, प्रति लोकल SMS 1 रुपया आकारण्यात येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo