VI : अखंडीत आणि मनसोक्त होईल मनोरंजन ! Hotstar सह 48GB डाटा फ्री..फ्री..फ्री..

HIGHLIGHTS

VI चा 901 रुपयांचा प्लॅन

प्लॅन 70 दिवसांच्या वैधतेसह येतो.

प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3GB डेटा

VI : अखंडीत आणि मनसोक्त होईल मनोरंजन ! Hotstar सह 48GB डाटा फ्री..फ्री..फ्री..

Vodafone Idea (Vi) ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. Vi आपल्या प्लॅनसह वापरकर्त्यांना भरपूर मोफत ऑफर देण्यासाठी प्रसिध्द आहे. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्लान शोधला आहे. दैनंदिन डेटासह, हा प्लॅन वापरकर्त्यांना अतिरिक्त मोफत डेटा आणि 1 वर्षाची Disney + Hotstar सबस्क्रिप्शन देखील देखील देतो. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

VI चा 901 रुपयांचा प्लॅन

VI चा 901 रुपयांचा प्लॅन 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. चला तर मग या प्लॅनचे बेनिफिट देखील बघुयात –

Vi च्या 901 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3GB डेटा मिळतो. 70 दिवसांच्या वैधतेनुसार हा प्लॅन 210GB डेटा एक्सेस देतो. यात फक्त दैनिक डेटा फायदे इतकेच मर्यादित नाहीत. तर, हा एक पैसावूल प्लॅन आहे. या प्लॅनसह कंपनी यूजर्सना अतिरिक्त 48GB डेटा मोफत देत आहे. अशा प्रकारे, तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण 258GB डेटा मिळणार आहे. यासह तुम्ही अखंडितपणे नेत वापरू शकता. तसेच, यात अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधा मिळणार आहे. 

आता सर्वात मनोरंजनात्मक विषयाकडे वळुयात, प्लॅनसह तुम्हाला एकूण एका वर्षासाठी Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळत आहे. त्याबरोबरच, इतर प्लॅन्स प्रमाणे, नाईट डाटा आणि विकेंड डेटा रोलओवरची सुविधा देखील तुम्हाला यात मिळणार आहे. हे बेनिफिट केवळ VI कंपनीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo