Jio ने जुलै महिन्यात आपल्या अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स महाग केले आहेत. होत्या. कंपनीचे एंटरटेनमेंट प्लॅन्स युजर्स भरपूर पसंत करतात. आता कंपनीने युजर्सना परत एकदा झटका दिला आहे. होय, Jio ने आता आपला मनोरंजन पॅक देखील महाग केला आहे. कंपनीने त्यांचे दोन मनोरंजन पॅक महाग केले आहेत, जे Netflix सबस्क्रिप्शनसह येतात.
Survey
✅ Thank you for completing the survey!
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये उपस्थित असलेल्या Netflix सबस्क्रिप्शन पॅकची किंमत 1,099 रुपये आणि 1499 रुपये होती. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे, आता हे दोन्ही पॅक महाग झाले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या Jio प्लॅन्सची नवी किंमत-
Jio कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये 2 एंटरटेनमेंट प्लॅन्स आहेत. हे प्लॅन्स Netflix च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतात. Jio चे 1,099 रुपये आणि 1,499 रुपयांचे प्लॅन्स महाग करण्यात आले आहेत. 1,099 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 रुपयांची वाढ झाली आहे. आता तुम्हाला हा प्लॅन 1,299 रुपयांमध्ये मिळेल. तर, 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 रुपयांची वाढ करण्यात आली असून हा प्लॅन 1,799 रुपयांना मिळेल.
Jio चा 1,299 रुपयांचा प्लॅन
हा Jio प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सला 2GB डेटाचा ॲक्सेस मिळतो. तसेच यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये तुम्ही दररोज 100SMS पाठवू शकता. विशेष म्हणजे हा प्लॅन मोफत Netflix सबस्क्रिप्शनसह येतो.
Jio चा 1,799 रुपयांचा प्लॅन
Jio चा हा प्लॅन देखील वरील प्लॅनप्रमाणे 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 3GB डेटा मिळणार आहे. 84 दिवसांच्या वैधतेनुसार हा प्लॅन तुम्हाला 252GB डेटाचा ॲक्सेस देईल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच, या प्लॅनसह तुम्ही दररोज 100SMS पाठवता येईल. प्लॅनची विशेषता म्हणजे तुम्हाला Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile