रिलायंस जियो यूजर्सना सेलिब्रेशन पॅक मधून मिळत आहे 10 GB पर्यंत फ्री डेटा

HIGHLIGHTS

रिलायंस जियो यूजर्सना सेलिब्रेशन पॅक अंतर्गत 10 GB पर्यंत अतिरिक्त डेटा मिळत आहे.

रिलायंस जियो ने या फेस्टिव सीजन मध्ये नवीन सेलिब्रेशन पॅक सादर केला आहे ज्यात खाई निवडक यूजर्सना त्यांच्या रिचार्ज प्लान्स व्यतिरिक्त जादा 10 GB डेटा मिळत आहे. हि ऑफर फक्त एंड्राइड यूजर्स साठी आहे. हा 10 GB डेटा पाच दिवस प्रतिदिन 2 GB या हिशोबाने मिळेल. यूजर्स 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत या प्लानचा वापर करू शकतील. 

अतिरिक्त डेटा आणि वापरासाठी मिळणार डेटा जाणून घेण्यासाठी यूजर्स गूगल प्ले स्टोर मधून मायजियो ऍप डाउनलोड करू शकतात. ऍप मध्ये तुमचा मोबाईल नंबर एंटर करताच तुम्ही तुमच्या नंबर संबंधित उपलब्ध सर्व माहित जसे कि ऑफर्स, यूसेज आणि बॅलेन्स इत्यादी जाणून घेऊ शकता. जियो यूजर्सना ऍप मध्ये मेनू आइकॉन वर जाऊन माय प्लान्स वर टॅप करावे लागेल ज्यात तुम्हाला ऍड-ऑन ऑफरिंग स्वरूपात जियो सेलिब्रेशन पॅकचा ऑप्शन मिळेल. 

रिलायंस जियो ने नुकताच एक नवीन प्लान सादर केला होता ज्याची किंमत Rs 1,699 आहे आणि हा 547GB डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि SMS ऑफर करतो तासदेच याची वैधता 365 दिवस आहे. हा नवीन प्लान फक्त प्रीपेड यूजर्स साठी सादर करण्यात आला आहे. 

जियोच्या दिवाळी ऑफर अंतर्गत यूजर्सना Rs 100 पेक्षा जास्त रिचार्ज केल्यास त्यावर 100% चा कॅशबॅक मिळत आहे. यूजर्सना हा कॅशबॅक रिलायंस डिजिटल वाउचर्सच्या स्वरूपात मिळेल आणि हा रिचार्ज प्लानच्या किंमतीचा वाउचर असेल. या वाउचर्सचा वापर रिलायंस डिजिटल स्टोर वर कमीत कमी Rs 5,000 ची खरेदी केल्यास करता येईल.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :