रिलायन्स जिओ 4G सेवा झाली सुरु, कशी वापरता येईल ही 4G सेवा

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 06 May 2016
HIGHLIGHTS
  • रिलायन्स अलीकडेच असे सांगितले की, त्यांची 4G सेवा जवळपास ५ लाख लोक ट्रायल पीरिएडमध्ये वापरत आहेत.

रिलायन्स जिओ 4G सेवा झाली सुरु, कशी वापरता येईल ही 4G सेवा
रिलायन्स जिओ 4G सेवा झाली सुरु, कशी वापरता येईल ही 4G सेवा

रिलायन्स जिओने आपल्या 4G सेवेला सर्वसामान्यांसाठी एक ट्रायल स्वरुपात सुरु केले आहे. मात्र ही सेवा ते तेव्हाच वापरु शकतात, जेव्हा कोणी रिलायन्सचा एम्प्लोयी त्याला सिम घेतल्यानंतर त्यांना निमंत्रण पाठवेल. त्याशिवाय ह्या सेवेला आताही सर्वच लोक वापरु शकत नाही.

त्याशिवाय जर तुम्हाला ही सेवा वापरायची असेल, तर आपल्याला LYF डिवाइस खरेदी करावा लागेल, तो सुद्धा रिलायन्सच्या डिजिटल स्टोरच्या माध्यमातून. त्यानंतरच तुम्ही ही सेवा वापरु शकता. LYF च्या डिवाइस बाजारात ५,५९९ रुपयांपासून १९,४९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

रिलायन्सच्या एका कर्मचा-यांचे म्हणणे आहे की, “जसे की आपल्या सर्वांना माहित असेल, की ही सेवा लाँच होण्यास आता काहीच अवधी राहिला आहे. आम्ही आमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला ही सेवा लाँच होण्याआधी वापरण्याची आकर्षक ऑफर देणार आहोत.”
 

हेदेखील पाहा - 6GB रॅमने सुसज्ज आहेत हे आकर्षक स्मार्टफोन्स


ह्या स्कीमच्या अंतर्गत रिलायन्स कोणताही कर्मचारी १० लोकांना रिलायन्स सिम आणि LYF हँडसेट खरेदी करण्यासाठी निमंत्रण पाठवू शकतो. आणि हे कनेक्शन आपल्याला 90 दिवसांत रिलायन्सची 4G सेवेचा आनंद घेण्याची संधी देईल आणि ते सुद्धा त्याच्या लाँच आधीच… त्याचबरोबर ज्याला निमंत्रण पाठवले गेले आहे, त्याला ह्या सेवेला सक्रिय करण्यासाठी २०० रुपये द्यावे लागतील.

त्यानंतर आपल्याला ९० दिवसांसाठी जिओच्या 4G सेवेअंतर्गत येणा-या जिओ प्ले, जिओ ऑन-डिमांड, जिओ मॅग, जिओ बीट्स आणि जिओ ड्रायवरचा सुद्धा आनंद घेता येईल.

हेदेखील वाचा - निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूट खरेदी करणे फायद्याचे?
हेदेखील वाचा - LeEco Leme ब्लूटूथ हेडफोन भारतात लाँच

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
reliance jio reliance jio 4g reliance jio employee referral program
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements