JIO चा पैसावसूल प्लॅन ! 90 दिवसांच्या वैधतेसह मिळेल सुपरफास्ट अमर्यादित डेटा-कॉलिंग सुविधा

JIO चा पैसावसूल प्लॅन ! 90 दिवसांच्या वैधतेसह मिळेल सुपरफास्ट अमर्यादित डेटा-कॉलिंग सुविधा
HIGHLIGHTS

JIO चा 1,197 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनसह तुम्हाला केवळ 399 रुपये दर महिन्याला खर्च येणार

प्लॅनमध्ये 90 दिवसांची म्हणजेच एकूण तीन महिन्यांची वैधता दिली जात आहे.

टेलिकॉम दिग्गज JIOकडे अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आहेत. यासह कंपनी Fiber Broadband प्लॅन्स आहेत. यामध्ये तुम्हाला मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक प्लॅन्स देखील दिले जातात. वार्षिक रिचार्ज जरा महागडे येतात म्हणून बरेच लोक हे रिचार्ज करण्यास टाळतात. पण एका महिन्याच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स सारखे घ्यावे लागतात. अशामध्ये तीन महिन्यांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स तुमच्यासाठी उत्तम ठरतात. 

JIO चा 1,197 रुपयांचा प्लॅन 

कंपनीकडे 90 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन्स आहेत, जे अनेक जबरदस्त बेनिफिट्ससह येतात. अनलिमिटेड फास्ट स्पीड इंटरनेटपासून अनलिमिटेड कॉलिंगपर्यंत अनेक फायदे यामध्ये मिळणार आहेत. Jio कडे 1,197 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 90 दिवसांची वैधता दिली जात आहे. 

बेनिफिट्स : 

या प्लॅनसह तुम्हाला केवळ 399 रुपये दर महिन्याला खर्च येणार आहे. या प्लॅनमध्ये 30Mbps चा स्पीड दिला जात आहे. ही अपलोड आणि डाउनलोड स्पीड दोन्ही आहे. याशिवाय यूजर्सना अनलिमिटेड डेटा देखील दिला जात आहे. Jio या प्लॅनसह दर महिन्याला 3.3 TB हाय-स्पीडवर अमर्यादित डेटाचा लाभ देते.

याशिवाय, वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. जर तुम्हाला मासिक रिचार्ज करायचे नसेल. आणि, दीर्घकाळासाठी अमर्यादित डेटा आणि कॉलिंगचा लाभ हवा असेल तर, हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo