Good News! Jio प्लॅनमध्ये JioHotstar ची मजा मिळेल मोफत! ‘या’ ऑफरच्या वैधतेत केली वाढ
Jio च्या अमर्यादित ऑफरची वैधता आणखी वाढवण्यात आली आहे.
IPL सुरू होण्यापूर्वी ही ऑफर बाजारात लाँच करण्यात आले होते.
वापरकर्ते 299 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्लॅन रिचार्ज करून ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये Jio ने क्रिकेट प्रेमींसाठी एक खास ऑफर सादर केली होती. या प्लॅनमध्ये लाईव्ह क्रिकेट ऍक्शन पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात होते, जे 31 मार्च 2025 पर्यंत लाईव्ह होते. मात्र, या ऑफरला मिळणारा लोकांचा पाहून आता कंपनीने या ऑफरच्या वैधतेत आणखी वाढ केली आहे. आता, क्रिकेटप्रेमी आणि इतर सर्व युजर्स या महिन्यातही ऑफरचा लाभ घेण्यास सक्षम असतील. तसेच, लाईव्ह क्रिकेट मॅच पाहू शकतील. जाणून घेऊयात सविस्तर-
SurveyJio ऑफरच्या वैधतेत वाढ
वर सांगितल्याप्रमाणे, Jio ची अमर्यादित ऑफर आता या महिन्यात देखील लाईव्ह असणार आहे. ही ऑफर आता 15 एप्रिल 2025 पर्यंत ग्राहकांसाठी सुरू राहील. या कालावधीत वापरकर्ते 299 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्लॅन रिचार्ज करून ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, प्रीपेड प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तीन महिने म्हणजेच 90 दिवसांसाठी JioHotstar चे सबस्क्रिप्शन मिळेल.

याव्यतिरिक्त, होम वायफाय देखील 50 दिवसांसाठी मोफत उपलब्ध असेल. कंपनीची ही ऑफर क्रिकेट प्रेमींसाठी आहे. IPL सुरू होण्यापूर्वी ही ऑफर बाजारात लाँच करण्यात आले होते. या ऑफरद्वारे वापरकर्ते त्यांच्या फोनवर IPL मॅचेसचे लाईव्ह स्ट्रीम पाहू शकतात. JioHotstar चे सबस्क्रिप्शन मोफत असणार आहे, मात्र तुम्हाला प्लॅन रिचार्ज करावा लागेल.
JioHotstar प्लॅन्स
100 रुपयांचा प्लॅन
JioHotstar मोबाईल प्लॅन 90 दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहे, या प्लॅनची वैधता 90 दिवसांची आहे. पण, लक्षात घ्या की, हे फक्त Jio च्या बेस प्लॅनसह कार्य करेल. रिचार्जमध्ये 5GB डेटा दिला जात आहे. महत्त्वाचे जाणून घ्या की, जिओच्या मासिक प्लॅनच्या ग्राहकांना दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्याच्या JioHotstar फायद्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या मूळ योजनेची वैधता संपल्यानंतर 48 तासांच्या आत रिचार्ज करावे लागेल.
195 रुपयांचा प्लॅन
या रिचार्ज प्लॅनमध्ये 15GB डेटा आणि 90 दिवसांच्या वैधतेसह मोफत JioHotstar मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते. हे मोफत सबस्क्रिप्शन फक्त 90 दिवसांसाठी वैध असेल. त्याचबरोबर, वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनसोबतही जिओचा बेस प्लॅन असणे आवश्यक आहे.
949 रुपयांचा प्लॅन
949 रुपयांचा प्लॅन JioHotstar मोबाईल प्लॅनमध्ये 84 दिवसांचा मोफत ऍक्सेस देतो. या प्लॅनची वैधता देखील 84 दिवस असेल, ज्यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100SMS आणि 2GB हाय-स्पीड दैनिक डेटा उपलब्ध असेल. लक्षात घ्या की, वापरकर्ते फक्त एकाच मोबाइल डिव्हाइसवर स्ट्रीम करू शकतील आणि यात जाहिराती देखील दाखवल्या जातील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile