भारीच की ! Jioच्या 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिझनी + हॉटस्टार फ्री, दीर्घकाळ वैधतेसह उपलब्ध

भारीच की ! Jioच्या 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिझनी + हॉटस्टार फ्री, दीर्घकाळ वैधतेसह उपलब्ध
HIGHLIGHTS

Jioकडून चार नवीन किफायतशीर रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध

नवीन प्लॅन्सची किंमत 151 रुपयांपासून सुरु.

प्लॅनमध्ये डिझनी + हॉटस्टार 3 महिन्यांसाठी उपलब्ध.

गेल्या वर्षी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवले होते. त्यानंतर ग्राहक स्वस्त रिचार्ज प्लॅन्सच्या शोधात आहेत. रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांची विश्वासहर्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी अनेक रिचार्ज प्लॅन्स बाजारात उपलब्ध करून देत असते. रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी काही स्वस्त प्लॅन आणले आहेत. यामध्ये डिझनी + हॉटस्टारचे सदस्यत्व ३ महिन्यांसाठी दिले जाईल. या प्लॅनच्या किंमती 151 रुपये, 333 रुपये, 583 रुपये आणि 783 रुपये आहेत. या सर्व योजना IPL 2022दरम्यान सादर करण्यात आल्या होत्या. मात्र, ज्या वापरकर्त्यांना स्वस्त Disney + Hotstar मोबाइल सदस्यता हवी आहे, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स उत्तम आहेत.

वापरकर्त्यांना म्हणजेच विशेषतः सध्याच्या तरुणाईला OTT प्लॅटफॉर्मचे एक वेगळेच क्रेझ आहे. त्यामुळे Jioचे नवीन प्लॅन्स या वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहेत. चला तर जाणून घेऊयात या नवीन प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती… 

जिओचा 151 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 151 रुपयांच्या प्लॅनची ​​विशेषता म्हणजे त्याची वैधता तुमच्या ऍक्टिव्ह प्लॅनवर अवलंबून असते. प्लॅनमध्ये, तुम्हाला 8 GB डेटा दिला जातो, जो वैधतेदरम्यान कधीही वापरला जाऊ शकतो. मात्र, या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि SMS उपलब्ध नाहीत. यामध्ये डिझनी + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी मोफत दिले जाईल, ज्याची किंमत 149 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा: भारतातील जबरदस्त रिचार्ज प्लॅन एक वर्षाच्या वैधतेसह उपलब्ध, किंमत केवळ 141 रुपये

जिओचा 333 रुपयांचा प्लॅन

333 रुपयांचा प्लॅन कॉलिंग आणि डेटा बेनिफिटसह येतो. यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटा दिला जातो. यासोबतच, तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. यामध्ये डिझनी + हॉटस्टार मोबाईल व्यतिरिक्त 3 महिन्यांसाठी जिओ ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.

जिओचा 583 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन देखील 333 रुपयांच्या प्लॅनसारखाच आहे. हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 1.5 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन उपलब्ध आहेत. डिझनी + हॉटस्टार मोबाईल व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी Jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.

जिओचा 783 रुपयांचा प्लॅन

783 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 1.5 GB डेटा दिला जातो म्हणजेच यामध्ये तुम्हाला  एकूण 126 GB डेटा मिळेल. यासोबतच, तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. यामध्ये सुद्धा वरील प्लॅन्सप्रमाणे डिझनी + हॉटस्टार मोबाईल व्यतिरिक्त 3 महिन्यांसाठी जिओ ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo