Limited Offer! Jio Republic Day ऑफरमध्ये ‘या’ रिचार्जवर मिळवा तब्बल 10 हजार रुपयांपर्यंत सवलत आणि बरेच बेनिफिट्स
Jio Republic Day 2024 ऑफर कंपनीने जाहीर केली आहे.
ग्राहकांना या प्लॅनसह रिचार्ज केल्यावर Swiggy कडून दोन कूपन मिळतील.
तसेच, लोकप्रिय शॉपिंग ऍप्सवरून खरेदी करताना देखील सूट मिळेल.
Jio प्रजासत्ताक दिन ऑफर 2024 अंतर्गत, कंपनी वापरकर्त्यांना अनेक फायदे देत आहे. दरवर्षी 26 जानेवारी 2024 रोजी भारतात साजरा होत असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रिलायन्स JIO ने ही ऑफर आणली आहे. कंपनीने Republic Day Offer 2024 जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना अनेक शॉपिंग कूपन मिळत आहेत. मात्र लक्षात घ्या की, ही ऑफर केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. ही ऑफर 15 जानेवारीपासून लागू झाली आहे आणि 31 जानेवारीपर्यंत रिचार्जवर उपलब्ध असेल.
SurveyJio Republic Day Offer 2024
कंपनीने 2,999 रुपयांच्या वार्षिक प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह Jio प्रजासत्ताक दिन ऑफर 2024 सादर केली आहे. ऑफर अंतर्गत, ग्राहकांना या प्लॅनसह रिचार्ज केल्यावर Swiggy कडून दोन कूपन मिळतील. ही कूपन वापरून तुम्हाला 299 रुपयांच्या खरेदीवर एकूण 125 रुपयांची सूट मिळेल. एवढेच नाही तर, रिलायन्स डिजिटल या ई-कॉमर्स वेबसाइटवरून किमान 5000 रुपयांच्या खरेदीवर युजर्सला 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकेल. लक्षात ठेवा की, निवडक उत्पादनांवर कूपन लागू होतील.
The freedom of unlimited choices is now packed into one exciting plan! ✨https://t.co/AP3FNfLxLs pic.twitter.com/VAFLoU8i3Z
— Reliance Jio (@reliancejio) January 16, 2024
ऑफर अंतर्गत उपलब्ध असलेल्या इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Ixigo द्वारे फ्लाइट तिकीट बुक करण्यावर 1,500 रुपयांपर्यंत सूट असेल. तर, Ajio कडून 2,499 रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची सवलत दिली जात आहे. तसेच, Tira वरून 999 रुपये किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर तुम्हाला 30% सूट मिळेल.
Jio चा 2,999 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनची वैधता संपूर्ण 365 दिवस म्हणजे एका वर्षाची आहे. यामध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला MyJio App किंवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. रिचार्ज केल्यानंतर, कूपन तुमच्या MyJio खात्यावर येतील. प्रत्येक कूपनला वेगळा कोड असेल. याचा वापर करून तुम्ही खरेदी करताना सूट मिळवू शकता. अधिक माहितीसाठी तुमच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile