Jio Recharge: 56 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि अनेक फायदे मिळतील स्वस्तात

HIGHLIGHTS

56 दिवसांच्या वैधतेसह जिओचा अप्रतिम प्लॅन

दररोज मिळेल 2GB इंटरनेट डेटा

तसेच या प्लॅनमध्ये तुमच्या मनोरंजनाची देखील सोय आहे.

Jio Recharge: 56 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि अनेक फायदे मिळतील स्वस्तात

आज आम्ही तुम्हाला रिलायन्स  Jioच्या एका पॉकेट फ्रेंडली प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला कमी किमतीत भरपूर डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि काही मोफत फायदे देतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत दररोज 2GB हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. याशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि अनेक मनोरंजन ऍप्सची सदस्यता देखील मिळेल. या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा अशा वापरकर्त्यांना होणार आहे, जे मोबाइल डेटा अधिक वापरतात आणि ज्यांना किमान दोन-तीन महिन्यांची वैधता असलेला प्लॅन हवा आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : जबरदस्त ऑफर ! Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन 3300 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध

या प्लॅन तुम्हाला 56 दिवसांची वैधता मिळते. तुम्ही Jio ऍप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 543 रुपयांमध्ये हा प्लॅन सक्रिय करू शकता. म्हणजेच तुम्हाला सुमारे 2 महिने रिचार्जचा विचार करावा लागणार नाही.   युजरला दररोज 2GB हाय स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच, वैधतेपर्यंत तुम्हाला एकूण 112GB डेटा दिला जातो. दैनंदिन मर्यादा संपल्यानंतरही, इंटरनेट 64Kbps च्या वेगाने सुरु राहील. 

याशिवाय यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगही मिळते. तसेच, रिलायन्स जिओच्या परवडणाऱ्या प्लॅनमध्ये समाविष्ट असलेला हा प्रीपेड पॅक दररोज मोफत 100SMS देखील देतो. 

 प्लॅनचे अतिरिक्त फायदे म्हणून, तुम्हाला JioTV, JioCinema JioSecurity, JioCloud सारख्या ऍप्सची सदस्यता देखील मिळते. JioTV द्वारे तुम्ही 56 दिवस ऍपवर विविध प्रकारच्या टीव्ही शोचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर तुम्हाला या पॅकसह JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल जे 56 दिवसांसाठी वैध असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo