JIOच्या ‘या’ प्रीपेड प्लॅन्समध्ये दररोज मिळतो 2.5GB हाय-स्पीड डेटा, बघा यादी

JIOच्या ‘या’ प्रीपेड प्लॅन्समध्ये दररोज मिळतो 2.5GB हाय-स्पीड डेटा, बघा यादी
HIGHLIGHTS

दररोज 2.5 GB डेटासह येणारे JIO प्लॅन्स

या प्लॅनसह कंपनी पात्र वापरकर्त्यांना हाय स्पीड इंटरनेट सेवा 5G मध्ये प्रवेश देखील देत आहे.

प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश

रिलायन्स JIO ही सध्या देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओकडे इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे लोकांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे प्री-पेड प्लॅन्स आहेत. त्याबरोबरच, Jio चे प्लॅन्स अजूनही Airtel आणि Vodafone Idea पेक्षा स्वस्त आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला Jio च्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात दररोज 2.5 GB डेटा मिळेल.

हे सुद्धा वाचा : Redmi Note 11T मोठ्या सवलतीसह खरेदी करा, मिळवा 500 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक

JIOचा 349 रुपयांचा प्लॅन

JIOचा 349 रुपयांचा प्री-पेड प्लॅन आहे, जो दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो. सर्व नेटवर्कसाठी असलेल्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS देखील मिळतात आणि या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश उपलब्ध आहे.

JIOचा 899 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स JIOच्या या प्लॅनमध्ये संपूर्ण तीन महिन्यांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटाही मिळतो. 899 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity सारख्या Jio ऍप्समध्ये प्रवेश देखील प्लॅनसह विनामूल्य उपलब्ध आहे. या प्लॅनसह कंपनी पात्र वापरकर्त्यांना हाय स्पीड इंटरनेट सेवा 5G मध्ये प्रवेश देखील देत आहे.

दररोज 2.5 GB डेटासह येणारा Airtel प्लॅन 

Airtel कडे 2.5 GB डेटा प्रतिदिन सह अनेक प्लॅन्स आहेत. यामध्ये एक प्लॅन 399 रुपयांचा आहे, जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. विशेष म्हणजे डिजनी + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी आणि Amazon प्राइम मेंबरशिप 84 दिवसांसाठी उपलब्ध आहे. यासोबतच सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo