Jio Plans under rs 500: दररोज मिळेल 2GB डेटासह कॉलिंग आणि बरेच बेनिफिट्स

HIGHLIGHTS

500 रुपयांअंतर्गत दररोज 2GB डेटासह येणारे प्रीपेड प्लॅन्स

299 रुपयांचा प्लॅन सर्वाधिक विकला जाणार प्लॅन आहे.

तुम्हाला दररोज जास्त डेटाची आवश्यकता असल्यास पुढील प्लॅन्सद्वारे रिचार्ज करा.

Jio Plans under rs 500: दररोज मिळेल 2GB डेटासह कॉलिंग आणि बरेच बेनिफिट्स

जर तुम्हाला दररोज जास्त डेटाची आवश्यकता असेल आणि कमी किमतीत रिचार्ज प्लॅन हवा असेल तर, हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला Reliance Jio च्या दररोज 2GB डेटासह येणाऱ्या रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. प्लॅनमध्ये इतरही लाभ मिळणार आहेत. बघुयात यादी – 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Jio चा 249 रुपयांचा प्लॅन : 

हा प्रीपेड प्लॅन 2GB दैनिक डेटा मर्यादेसह एकूण 46GB डेटासह येतो. हे अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud यासह Jio ऍप्सचे  विनामूल्य सबस्क्रिप्शन देखील देते. हे सर्व बेनिफिट्स तुम्हाला 23 दिवसांच्या वैधतेसह मिळतील.

Jio चा 299 रुपयांचा प्लॅन:

 500 अंतर्गत सर्वाधिक विकल्या जाणार्‍या म्हणजेच लोकप्रिय प्रीपेड प्लॅनपैकी हा एक आहे. यात 28 दिवसांच्या वैधतेसह 2GB दैनिक डेटा मर्यादेसह एकूण 56GB डेटा मिळतो. हे अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud यासह Jio ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.

500 रुपयांच्या श्रेणीत येणारे प्लॅन 

 Jio चा 533 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा मिळत आहे. याशिवाय, इतर फायद्यांबद्दल बोलयचे झाल्यास, रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100SMS आणि निवडक Jio ऍप्सचे ऍक्सेस दिले जात आहे.  

Jio चा 589 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये देखील वरील प्लॅनप्रमाणे 56 दिवसांची वैधता दिली जात आहे. त्याबरोबरच, दररोज 2GB डेटा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यात ऍड फ्री म्युझिक आणि अमर्यादित Jiotune चा लाभ युजरला मिळेल. त्याबरोबरच, वरील सर्व प्लॅन्सप्रमाणे कॉलिंग आणि SMSची सुविधा उपलब्ध आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo