Jio Plans Under Rs.200: कमीत कमी किमतीत कंपनीचे Best प्लॅन्स, मिळेल भरपूर डेटा आणि Unlimited कॉलिंग 

Jio Plans Under Rs.200: कमीत कमी किमतीत कंपनीचे Best प्लॅन्स, मिळेल भरपूर डेटा आणि Unlimited कॉलिंग 
HIGHLIGHTS

Jio आपल्या वापरकर्त्यांना कमी किमतीत अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते.

Jio चे 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या सर्वोत्तम प्लॅन्सची यादी

यादीतील प्लॅन्सची किंमत 149 रुपयांपासून सुरु

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio आपल्या वापरकर्त्यांना कमी किमतीत अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. जर तुम्ही Jio वापरकर्ते असाल आणि तुमचा रिचार्ज प्लॅन कमी किमतीत शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. आम्ही तुम्हाला Jio च्या स्वस्त आणि उत्तम बेनिफिट्ससह येणाऱ्या स्वस्त प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या काही सर्वोत्तम प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.

Jio चा 149 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनची ​​किंमत 149 रुपये आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये 20 दिवसांची वैधता आहे. यामध्ये दररोज एकूण 1 GB इंटरनेट डेटा देखील उपलब्ध असेल. त्याबरोबरच, या प्लॅनसह Jio कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देईल.

Jio plans under rs 200
jio plans

Jio चा 155 रुपयांचा प्लॅन

यादीतील दुसऱ्या प्लॅनची किंमत 155 रुपये आहे. यासोबतच, प्लॅनमध्ये एकूण 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये एकूण 2GB इंटरनेट डेटाही उपलब्ध असेल. डेटा व्यतिरिक्त हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 300SMS च्या सुविधेसह येतो.

Jio चा 179 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 179 रुपयांचा प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळेल. हा प्लॅन संपूर्ण 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. तुम्ही दररोज 1GB डेटाचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला या 24 दिवसांत 24GB डेटा मिळेल. यासोबतच, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS देखील दिले जात आहेत. या सर्वांसह तुम्हाला मोफत Jio ॲप फायदे देखील मिळतील.

Jio चा 199 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 1.5GB डेटा देत आहे. या प्लॅनची ​​वैधता एकूण 23 दिवसांची आहे. वैधतेदरम्यान, तुम्हाला एकूण 34.5 GB 4G डेटा मिळेल. यासह तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सर्व्हिस मिळेल. त्याबरोबरच, कंपनी तुम्हाला दररोज 100SMS देखील देते. याव्यतिरिक्त, कंपनी Jio ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo