रिलायन्स Jioने Airtel शी स्पर्धा करण्यासाठी नवीन Jio AirFiber प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन्स ग्राहकांसाठी अनेक बेनिफिट्ससह येतात. कंपनीने नवीनतम प्लॅन्स 3 महिन्यांच्या वैधतेसह समाविष्ट केले आहेत. हा नवीनतम प्लॅन बजेट फ्रेंडली किमतीत येतो. एवढे नाही तर, नव्या प्लॅनमध्ये 30Mbps स्पीड मिळेल. ज्यामुळे अनेक वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन उत्तम ठरणार आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Jio AirFiber 599 रुपयांचा प्लॅन
Jio AirFiber च्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 Mbps इंटरनेट स्पीडसह डेटा वापरता येईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 1000GB डेटा मिळतो. या एंट्री लेव्हल प्लॅनमध्ये अनेक बेनिफिट्स मिळतात. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Disney + Hotstar, SonyLIV, Zee5, Jio Cinema, Sun NXT, Voot, Discovery +, ALT Balaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay, EpicON आणि ETV Win सारख्या 14 OTT प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळतात.
एवढेच नाही तर, येथे तुम्हाला 800 पेक्षा जास्त ऑन-डिमांड चॅनेलचे ऍक्सेस मिळेल. याशिवाय, या प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्या वापरकर्त्यांना किंचित वेगवान इंटरनेट स्पीड हवी असेल, ते Jio चा 100Mbps चा प्लॅन खरेदी करू शकतात.
या 899 रुपये प्रति महिना प्लॅनमध्ये 100Mbps पर्यंत स्पीड आणि OTT चॅनेलमध्ये ऍक्सेस मिळेल. त्याबरोबरच, दुसऱ्या प्लॅनमध्ये 1,199 रुपये प्रति महिनामध्ये 100 Mbps स्पीड, OTT चॅनेलचे ऍक्सेस, Netflix आणि Amazon Prime सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय जिओ तीन महिन्यांचे प्लॅनही उच्च गतीसह ऑफर करते. अधिक माहितीसाठी तुम्ही Jio च्या अधिकृत साईटला भेट देऊ शकतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile