भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स Jio आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन प्लॅन्स आणि ऑफर्स जाहीर करत असते. Jio कडे स्वस्त ते महागड्या प्लॅन्ससह मोठा पोर्टफोलिओ आहे. दरम्यान, कंपनीने एक नवीन प्लॅन सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन कमी किमतीत सर्वात जास्त डेटासह येतो. हा एक नवीन डेटा प्लॅन आहे, जो वापरकर्त्यांना मर्यादित काळासाठी हाय स्पीड इंटरनेट डेटा प्रदान करेल. Jio ने नवा प्लॅन केवळ 11 रुपयांच्या किमतीत सादर केला आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Jio ने 11 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन
Jio वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण Jio ने गुप्तपणे त्यांच्या वेबसाइटवर 11 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सूचीबद्ध केला आहे. नव्या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 तासासाठी हाय स्पीड इंटरनेट अमर्यादित डेटा दिला जातो. ज्या ग्राहकांना कमी वेळेत जास्त डेटा हवा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे.
लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये युजर्सना हाय स्पीडवर 10GB डेटा दिला जाईल. 10GB डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड आपोआप कमी होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्या वापरकर्त्यांना काही काळासाठी अधिक डेटा आवश्यक आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरू शकतो. जिओचा हा स्वस्त प्लॅन वापरकर्त्यांसाठी हेवी फाइल्स किंवा गेम्स डाउनलोड करताना खूप उपयुक्त सिद्ध होणार आहे. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!
Jio डेटा पॅक
49 रुपयांच्या पॅकमध्ये 1 दिवसाची वैधता आणि 25 GB डेटा, 69 रुपयांच्या पॅकमध्ये सक्रिय प्लॅन वैधता आणि 6GB डेटा, 175 रुपयांच्या पॅकमध्ये 28 दिवसांची वैधता, OTT फायदे आणि 10GB डेटा बेनिफिट्स मिळतात. त्याबरोबरच, थोड्या महाग प्लॅन्सकडे वळल्यास 219 रुपयांच्या पॅकमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 30GB डेटा, 289 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 40GB डेटा आणि 359 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 50GB डेटा मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile