रिलायन्स Jio कडून एक स्पेशल फ्री ट्रायल ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये एका महिन्यासाठी फ्री डेटा आणि कॉलिंग देण्यात येत आहे. त्यानंतर, जर ग्राहकांना हे बेनिफिट्स पुन्हा हवे असतील तर, ते 399 आणि 699 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करू शकतात. मात्र, ही ऑफर केवळ 30 दिवसांसाठी मोफत मिळेल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
'अशा'प्रकारे ऑफरचा लाभ घ्या.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 7000070000 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. जिओचे 399 आणि 699 रुपयांचे हे दोन्ही प्लॅन पहिल्या महिन्यासाठी मोफत असतील. कंपनीचे हे लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन्स आहेत. लक्षात घ्या की, प्लॅनसोबत टॅक्स सुद्धा भरावा लागणार आहे. याशिवाय पहिल्या महिन्यात 500 रुपये सिक्योरिटी डिपॉझिट देखील द्यावे लागेल.
प्लॅनसह घरातील तीन सदस्य जोडता येतील. प्रत्येक सदस्यानुसार 99 रुपये वेगळा खर्च द्यावा लागतो. तसेच, यात 75GB डेटा देखील दिला जाईल. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधाही आहे. हा प्लॅन 4 सदस्यांसह टॅक्ससह सुमारे 694 रुपयांची आहे. यासह तुम्हाला सिक्योरिटी डिपॉझिट देखील भरावे लागेल.
Jio चा 699 रुपयांचा फॅमेली प्लॅन
प्लॅनमध्ये 100GB डेटा दिला जात आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगही मिळेल. यामध्ये घरातील एकूण चार सदस्य जोडता येतील. विशेष म्हणजे यासोबतच या प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon Primeचे फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून स्वतंत्रपणे 99 रुपये खर्च येणार आहे. एकूण 4 सदस्यांसह हा प्लॅन सुमारे 1,196 रुपयांना येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile