स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल डेली जवळपास 3GB पर्यंत डेटा, OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध

स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल डेली जवळपास 3GB पर्यंत डेटा, OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध
HIGHLIGHTS

तिन्ही टेलिकॉम कंपन्यांचे 399 रुपयांचे प्लॅन्स

स्वस्तात मिळतोय भरपूर आणि 5G डेटाचा लाभ

ग्राहकांना Disney + Hotstar चे सब्स्क्रिप्शन मिळेल.

तिन्ही टेलिकॉम दिग्गज म्हणजेच Vodafone-Idea, AIRTEL आणि JIO ग्राहकांसाठी जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर करतात. मात्र, तुम्हाला जर दररोज भरपूर इंटरनेट डेटाची आवश्यकता असेल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही घरून ऑफिसचे काम करत असेल तर तिन्ही कंपन्यांचे 399 रुपयांचे प्लॅन्स तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरतील. चाल तर मग या प्लॅन्सचे सविस्तर तपशील बघुयात-

 Vodafone-Idea चा 399 रुपयांचा प्लॅन 

Vodafone-Idea चा हा प्लॅन 28 दिवसांच्या सेवा वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2.5GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगचा लाभ देखील मिळेल आणि दररोज 100 मोफत SMS देतो. तसेच, या प्लॅनमध्ये स्बस्क्राइबर्सना Disney + Hotstar चे तीन महिन्यांचे सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे. 

इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, बिंज ऑल नाईट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्ससह VI Movies आणि TV ऍपचे सब्स्क्रिप्शन देखील मिळेल. 

JIO चा 399 रुपयांचा प्लॅन 

JIO चा हा प्लॅन 28 दिवसांच्या सेवा वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 3GB डेटा देत आहे. तसेच, यामध्ये 6GB अतिरिक्त मोफत डेटादेखील उपलब्ध आहे. पात्र ग्राहकांना कंपनी 5G डेटाचा लाभ देणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगचा लाभ देखील मिळेल आणि दररोज 100 मोफत SMS देतो. तसेच, या प्लॅनमध्ये JIO TV, JIO CINEMA आणि JIO APPS चा फ्री ऍक्सेसदेखील देत आहे. 

AIRTEL चा 399 रुपयांचा प्लॅन 

AIRTEL चा हा प्लॅन 28 दिवसांच्या सेवा वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2.5GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगचा लाभ देखील मिळेल आणि दररोज 100 मोफत SMS देतो. पात्र ग्राहकांना कंपनी 5G डेटाचा लाभ देणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये स्बस्क्राइबर्सना Disney + Hotstar चे तीन महिन्यांचे सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे. याशिवाय, विंक म्युझिकचे फ्री सब्स्क्रिप्शन आणि FASTag वर 100 रुपयांचे कॅशबॅक देखील मिळेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo