HIGHLIGHTS
Jio चा 91 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज इंटरनेट डेटाची सुविधा देखील मिळेल.
याच किमतीत इतर कंपन्यांचे प्लॅन्स
Jio कडे 91 रुपयांमध्ये एक महिन्याची वैधता असलेला प्रीपेड प्लॅन दररोजच्या डेटासह उपलब्ध आहे. यामध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि डेटा उपलब्ध आहे. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Jio ने आपल्या JioPhone यूजर्ससाठी हा खास प्लॅन ऑफर केला आहे. जाणून घेऊयात प्लॅनची सविस्तर माहिती…
Surveyहे सुद्धा वाचा : Valentine ऑफर ! iPhone 14 Plus मिळतोय फक्त 46,990 रुपयांमध्ये, इतर फोन्स देखील स्वस्तात
Jio च्या 91 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग दिले जाते. या प्लॅनमध्ये दररोज 100MB डेटा दिला जातो, त्यासोबत 200MB डेटा देखील स्वतंत्रपणे मिळतो. प्लॅनच्या वैधतेदरम्यान एकूण 3GB डेटा मिळतो. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 50 SMS मिळतात.
या प्लॅनमध्ये Jio ऍप्सचा मोफत ऍक्सेस देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. लक्षात घ्या की, हा प्लॅन फक्त JioPhone साठी आहे. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो.
Airtel च्या 98 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 5GB डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता सध्याच्या प्लॅनसारखीच आहे. इतर फायद्यांसाठी, या प्लॅनमध्ये Wynk प्रीमियम सबस्क्रिप्शन 30 दिवसांसाठी उपलब्ध आहे.
Vodafone Idea च्या 99 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 200MB डेटा दिला जातो. व्हॉईस कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम देण्यात आला आहे. लोकल आणि STD कॉलसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद दराने शुल्क आकारले जाते. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile