Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! महिन्याभरासाठी मिळेल अमर्यादित कॉलिंग आणि डेली डेटा

Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! महिन्याभरासाठी मिळेल अमर्यादित कॉलिंग आणि डेली डेटा
HIGHLIGHTS

JIO चा 91 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि SMSचे फायदे

किफायती दरात उत्तम बेनिफिट्स देणारे इतर प्लॅन्स बघा

Jio: Jio अनेकदा नवनवीन प्लॅन लाँच करत असते. जर तुम्हीही स्वस्त प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला जिओच्या एका नवीन प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेटाची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, त्याची किंमत देखील खूप कमी आहे. 

JIO चा 91 रुपयांचा प्लॅन 

Jioच्या 91 रुपयांच्या रिचार्जची वैधता 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही स्वतंत्रपणे दिली जात आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 3GB डेटा दिला जातो. त्याबरोरबच, यामध्ये तुम्हाला रोज 50 SMS दिले जातात. तुम्हाला दररोज फक्त 100 MB डेटा मिळणार आहे. पण हा प्लॅन फक्त जिओ फोन यूजर्ससाठी दिला जात आहे.

JIO कडे किफायती दरात उत्तम बेनिफिट्स देणारे इतरही प्लॅन्स आहेत. या प्लॅन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी JIO ऍप किंवा अधिकृत साईटला भेट द्या.   

Jio चा 152 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 

Jioचा 152 रुपयांच्या रिचार्जची वैधता 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये एकूण 14GB डेटा देण्यात आला आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.  यासोबतच, 300 SMS ही दिले जातात. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio सिक्युरिटी यांसारख्या ऍप्सचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळेल.

Jio चा 186 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio 186 रिचार्जमध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग दिले जाते. यासोबतच दररोज 1GB डेटाही दिला जातो. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS दिले जातात. तुम्हाला 28 दिवसांसाठी 28 GB डेटा दिला जातो. तुम्हाला सबस्क्रिप्शनबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी यांसारख्या ऍप्सचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत दिले जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo