भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम दिग्गज कंपनी रिलायन्स Jio यावर्षी आपला 8वा वर्धापन दिन म्हणजेच ऍनिव्हर्सरी साजरी करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ऍनिव्हर्सरीनिमित्त कंपनीने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. नवीन ऑफरसह कंपनी आपल्या वापरकर्त्यांना विद्यमान प्लॅन्ससह अनेक नवीन बेनिफिट्स देत आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
वापरकर्त्यांनी लक्षात घ्यावे की, कंपनीची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे, ज्याचे फायदे फक्त काही दिवसांसाठी उपलब्ध असतील. कंपनीने आपल्या विद्यमान 3 प्रीपेड प्लॅनसह ही ऑफर जाहीर केली आहे. जाणून घेऊयात सर्व तपशील-
वर सांगितल्याप्रमाणे, Jio कंपनीने 8 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान 899 रुपये, 999 रुपये आणि 3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये ही ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर आजपासून म्हणजे 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत लाईव्ह असेल. त्यामुळे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त 5 दिवसांचा अवधी आहे.
Jio चा 899 रुपयांचा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटाची सुविधा मिळते. तर, Jio चा 999 रुपयांचा प्लॅन 98 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटाची सुविधा मिळेल. याव्यतिरिक्त, Jio चा 3,599 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटाची सुविधा मिळते.
Jio 8th Anniversary ऑफर बेनिफिट्स
ऍनिव्हर्सरी ऑफरनिमित्त कंपनी या तिन्ही प्लॅन्समध्ये 1, 2 नाही तर एकाच वेळी 10 OTT Apps चे मोफत सबस्क्रिप्शन देणार आहे. तसेच, 10GB डेटा पॅक 28 दिवसांसाठी उपलब्ध असेल, ज्याची किंमत 175 रुपये आहे. या खास प्रसंगी Jio आपल्या ग्राहकांना या प्लॅन्ससह मोफत Zomato गोल्ड मेंबरशिप देखील देत आहे. ही मेंबरशिप 3 महिने लाइव्ह राहील. याशिवाय, 2,999 रुपयांच्या वरच्या खरेदीवर 500 रुपयांपर्यंतचे AJIO व्हाउचर देखील मिळणार आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile