JIO ची विशेष ऑफर! फक्त 699 रुपयांमध्ये मिळेल Netflix, Amazon Prime सब्स्क्रिप्शन्स

JIO ची विशेष ऑफर! फक्त 699 रुपयांमध्ये मिळेल Netflix, Amazon Prime सब्स्क्रिप्शन्स
HIGHLIGHTS

JIO चा 699 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon प्राईमचे सदस्यता विनामूल्य

हा प्लॅन एका महिन्याच्या मोफत चाचणीसह येतो.

रिलायन्स JIO द्वारे एक विशेष ऑफर देण्यात आली आहे. अलीकडेच, जिओने नुकताच जिओ फॅमिली प्लस प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये 699 रुपयांचा प्लॅन येतो. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime व्हिडिओचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय मोफत डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा देण्यात आल्या आहेत. याविषयी सविस्तर जाणून घ्या. 

हे सुद्धा वाचा : Airtel वापरकर्त्यांची मजा ! मिळणार Unlimited 5G Data, फक्त मान्य करावी लागेल 'ही' अट

JIO चा 699 रुपयांचा प्लॅन

JIO चा 699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. तसेच 100GB डेटा देण्यात आला आहे. याशिवाय 100 SMS ची सुविधाही देण्यात येत आहे. यासोबतच Netflix आणि Amazon Prime व्हिडिओचे सब्सक्रिप्शन एका महिन्यासाठी दिले जात आहे.

 जिओचा 699  रुपयांचा प्लॅन एका महिन्याच्या मोफत चाचणीसह येतो. याचा अर्थ तुमच्याकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर तुम्हाला सेवा आवडत नसेल तर तुम्ही ती बंद करू शकता. या प्लॅनमध्ये कुटुंबातील तीन सिम जोडले जाऊ शकतात. प्रत्येक सिम जोडण्यासाठी 99 रुपये शुल्क द्यावे लागेल. अधिक माहितीसाठी JIOच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

JIO चा 399 रुपयांचा प्लॅन

Jioची 399 रुपयांचा एक कौटुंबिक पोस्टपेड प्लॅन आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच 75GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये कुटुंबातील तीन सदस्यही जोडले जाऊ शकतात. यामध्ये एक महिन्यासाठी मोफत चाचणी दिली जात आहे. तसेच 500 रुपये सुरक्षा ठेव म्हणून द्यावे लागतील. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo