FIFA World Cup पूर्वी Jio ने आणले 5 जबरदस्त प्लॅन, फक्त काही युजर्सना मिळेल लाभ

FIFA World Cup पूर्वी Jio ने आणले 5 जबरदस्त प्लॅन, फक्त काही युजर्सना मिळेल लाभ
HIGHLIGHTS

Jio ने 5 रोमिंग प्लॅन फुटबॉल वर्ल्ड कपसाठी लाँच केले.

हे प्लॅन्स त्या जिओ वापरकर्त्यांसाठी पात्र आहेत ज्यांना कतार, सौदी अरेबिया आणि यूएईला जायचे आहे.

या प्लॅनची सुरुवातीची किंमत 1,122 रुपये.

Reliance Jio ने पाच नवीन प्लॅन लाँच केले आहेत. मात्र, कंपनीने हे प्लॅन फक्त काही युजर्ससाठी सादर केले आहेत. मुळात हे सर्व रोमिंग प्लॅन आहेत आणि जिओ वापरकर्त्यांसाठी पात्र आहेत, ज्यांना कतार, सौदी अरेबिया आणि UAE ला जायचे आहे. हे रोमिंग प्लॅन 1,122 रुपयांपासून सुरू होतात आणि 6,799 रुपयांपर्यंत जातात. येथे आम्ही तुम्हाला या सर्व प्लॅन्स द्दल तपशीलवार माहिती देणार आहोत.  FIFA World Cupपूर्वी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

हे सुद्धा वाचा : कॉलिंग फिचरसह Amazfitची आकर्षक, परवडणारे स्मार्टवॉच भारतात लाँच, मिळतोय 700 रुपयांचा डिस्काउंट

FIFA WORLD CUP आधी JIO  जबरदस्त प्लॅन लाँच  

Jio ने हे रोमिंग प्लॅन  फुटबॉल वर्ल्ड कपसाठी लाँच केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, जर तुम्ही कतार, सौदी अरेबिया आणि UAE मध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, Jio ने आता तुमच्यासाठी पाच रोमिंग प्लॅन्स आणले आहेत. या पाच प्लॅनच्या किमती रु 1,122, रु 1,599, रु 3,999, रु 5,122 आणि रु 6,799 असे आहेत. बघुयात सविस्तर… 

JIO चा 1,122 रुपयांचा प्लॅन 

JIO च्या या प्लॅनची ​​किंमत 1,122 रुपये आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 1GB हाय स्पीड डेटा मिळत आहे, हा प्लॅन 5 दिवसांच्या वैधतेसह येतो.

JIO चा 1599 रुपयांचा प्लॅन

 या प्लॅनमध्ये तुम्हाला 150 मिनिटांपर्यंत आउटगोइंग आणि इनकमिंग कॉल्स मिळत आहेत, याशिवाय तुम्हाला 1GB डेटा देखील मिळत आहे. तसेच या प्लॅनमध्ये 100 SMS देखील दिले जात आहेत. या प्लॅनची वैधता 15 दिवसांची आहे.

JIO चा 3,999 रुपयांचा प्लॅन  

या प्लॅनमध्ये तुम्हाला 250 मिनिटे आउटगोइंग आणि 250 मिनिटे इनकमिंग मिळत आहेत. याशिवाय तुम्हाला या प्लॅनमध्ये 100 SMS देखील दिले जात आहेत. तुम्हाला या प्लॅनमध्ये 3GB डेटा मिळत आहे. यामध्ये तुम्हाला 30 दिवसांची वैधता मिळत आहे.

JIO चा 5,122 रुपयांचा प्लॅन 

 जर आपण या प्लॅनवर चर्चा केली तर या प्लानमध्ये तुम्हाला 5GB डेटा दिला जात आहे, याशिवाय तुम्हाला यामध्ये 21 दिवसांची वैधता देखील मिळत आहे.

JIO चा 6,799 रुपयांमध्ये येणार प्लॅन 

 या प्लॅनमध्ये तुम्हाला 500 मिनिटे आउटगोइंग आणि फ्री इनकमिंग मिळत आहे. याशिवाय तुम्हाला या प्लॅनमध्ये 5GB डेटासह 100 SMS देखील मिळत आहेत. या प्लॅनची वैधता देखील 30 दिवसांची आहे.

हे प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहेत आणि तुम्हाला Jio वेबसाइटवरून हे प्लॅन रिचार्ज करता येतील. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo