देशातील आघाडीची टेलिकॉम दिग्गज रिलायन्स Jio कडे अनेक आकर्षक प्लॅन्स आहेत. कंपनीचे हे प्लॅन्स नाईक अप्रतिम बेनिफिट्ससह सादर केले गेले आहेत. प्लॅनमधील बेनिफिट्स ऐकून युजर्स नेहमीच खुश होतात. कारण, बरेच प्लॅन्स वापरकर्त्यांना परवडणाऱ्या किमतीत अनेक सुविधा देतात. आता अधिकाधिक दैनंदिन कामे डिजिटल पद्धतीने केली जातात. त्यामुळे युजर्सना नेहमीच भरपूर डेटाची आवश्यकता असते.
या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या 399 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटासह कॉलिंग आणि SMS सुविधा देखील मिळेल. एवढेच नाही तर, यात युजर्सच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. जाणून घ्या संपूर्ण बेनिफिट्स-
Jio चा 399 रुपयांचा प्लॅन
Jio ने आपल्या ग्राहकांसाठी 399 रुपयांचा प्लॅन ऑफर केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनीने रोजच्या डेटासोबत अतिरिक्त फ्री डेटाही दिला आहे. वास्तविक, या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 3GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, या Jio प्लानमध्ये 6GB डेटा मोफत उपलब्ध आहे. हा प्लॅन संपूर्ण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्यामुळे वैधतेदरम्यान या प्लॅनमध्ये कंपनी एकूण 90GB डेटा ऑफर करते.
हा Jio प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह येतो. त्याबरोबरच, प्लॅनमध्ये दररोज 100SMS देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पात्र ग्राहकांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटाचा ऍक्सेस मिळेल. म्हणजेच तुमच्या परिसरात 5G सेवा उपलब्ध असेल तर, तुम्हाला या प्लॅनसह 28 दिवस अमर्यादित 5G इंटरनेटचा लाभ घेता येईल.
हा प्लॅन JioTV, JioCinema, JioCloud सारख्या ॲप्सचे सबस्क्रिप्शन देखील देतो. विशेषतः या प्लॅनमध्ये JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट केले आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर चित्रपट, टीव्ही शो, क्रिकेट मॅच इत्यादींचा आनंद घेऊ शकता. प्लॅन रिचार्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile