HIGHLIGHTS
संपूर्ण कुटुंबासाठी 399 रुपयांचा प्लॅन
यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटासह कॉलिंग फ्री मिळेल
हा जिओचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन आहे
रिलायन्स JIO कडे अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आहेत. बहुतेक कुटुंबांमध्ये, वेगवेगळे लोक त्यांच्या इंटरनेटसाठी वेगवेगळे रिचार्ज करतात. मात्र, जीओच्या या प्लॅनमुळे फक्त तुमचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची इंटरनेटची गरज भागणार आहे. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो. हा प्लॅन जिओ फायबरचा आहे, ज्याची किंमत 399 रुपये आहे.
Surveyहे सुद्धा वाचा : जबरदस्त ! 15 दिवसांच्या बॅटरी लाइफसह Amazfit GTS 4 Mini स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या किंमत
आम्ही ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत, तो जिओचा ब्रॉडबँड प्लॅन आहे. JioFiber च्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 399 रुपये आहे (GST एक्सक्लुझिव्ह). विशेष बाब म्हणजे प्लॅनमध्ये इतका डेटा उपलब्ध आहे की, कुटुंबात 5 लोक राहत असले तरी सर्वांची इंटरनेटची गरज पूर्ण होऊ शकते.
वास्तविक, या प्लॅनमध्ये कंपनी एका महिन्यासाठी अमर्यादित डेटा देत आहे. तुम्हाला डेटा स्पीड 30Mbps मिळणार आहे. याद्वारे तुम्ही 10 स्मार्टफोन आणि अनेक स्मार्ट उपकरणे कनेक्ट करू शकता. खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला एक लँडलाइन नंबर देखील दिला जातो, ज्याद्वारे तुम्ही अनलिमिटेड कॉलिंग देखील करू शकता. कॉलिंग सुविधेमुळे तुमच्या स्मार्टफोनला रिचार्ज करण्याची गरजही नाहीशी होते.
जर तुमचे घरून काम सुरु असेल तर याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. जर एखादी स्त्री गृहिणी असेल आणि बहुतेक वेळा घरीच राहते, तर त्यांच्यासाठीही हा प्लॅन खूप छान होईल. याशिवाय, ते तुमच्या स्मार्ट टीव्हीवरून इतर उपकरणांनाही इंटरनेट पुरवेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile