रिलायन्स JIO अनेक फॅमिली प्लॅन ऑफर करते, यापैकी एक फॅमिली प्लॅन 399 रुपयांचा आहे. म्हणजेच JIO कडे स्वस्तात संपूर्ण कुटुंबाच्या रिचार्जची योजना आहे. या फॅमिली प्लॅनमध्ये तुमच्यासोबत कुटुंबातील इतर तीन मेम्बर्सना मोफत कॉलिंगसह 75GB डेटा दिला जातो. जर तुमच्या कुटुंबातील चारही लोक Jio चे सिम वापरत असतील तर तुमच्यासाठी हा प्लॅन योग्य ठरेल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
JIO चा 399 रुपयांचा प्लॅन
JIO कडे 399 रुपयांचा फॅमिली प्लॅन आहे. यात युजर्सना अमर्यादित कॉलिंगसह 75GB डेटा दिला जातो आणि मोफत मेसेजिंग देखील उपलब्ध आहे. दरम्यान, तुमच्यासाठी एक महिन्याची मोफत चाचणी देखील दिली जात आहे. याद्वारे रिचार्ज न करता एका महिन्यासाठी फॅमिली प्लॅनचा आनंद घेता येईल.
या फॅमिली प्लॅनमध्ये एका सिमसह अतिरिक्त तीन सदस्य जोडता येतील. मात्र लक्षात घ्या की, प्रत्येक सदस्य जोडण्यासाठी प्रत्येकी 99 रुपये स्वतंत्रपणे द्यावे लागणार आहेत. अशाप्रकारे महिन्याला तुमच्या कुटुंबाचा एकूण खर्च 696 रुपये असेल. त्याबरोबरच, 500 रुपयांचा सिक्योरिटी डिपॉझिट देखील भरावा लागणार आहे.
सिक्योरिटी डिपॉझिट केवळ पहिल्या महिन्यासाठी असेल. म्हणजे पहिल्या महिन्याला तुम्हाला एकूण 1196 रुपयांचा खर्च येईल. मात्र, कार्पोरेट कर्मचारी आणि इतर निवडक युजर्ससाठी सिक्योरिटी डिपॉझिट मोफत असणार आहे. त्यानंतर, दुसऱ्या महिन्यापासून एकूण खर्च 696 रुपये भरावा लागेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile