Jioचा अगदी पैसा वसूल प्लॅन ! डेटा-अनलिमिटेड कॉलिंग मिळेल फक्त 152 रुपयांमध्ये

Jioचा अगदी पैसा वसूल प्लॅन ! डेटा-अनलिमिटेड कॉलिंग मिळेल फक्त 152 रुपयांमध्ये
HIGHLIGHTS

JIO चा 152 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता समाविष्ट

प्रत्येक नेटवर्कवर कॉलिंगसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभ

तुम्ही जर JIO यूजर असाल तर आज आम्ही तुम्हाला एका शानदार प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. कंपनी अतिशय स्वस्त प्लॅन देत आहे. त्यापैकी 152 रुपयांचा प्लॅन खूप चांगला आहे. यामध्ये कमी किमतीत अधिक फायदे दिले जात आहेत. या प्लानमध्ये दैनंदिन डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह इतर अनेक फायदे दिले जात आहेत. चला तर मग प्लॅनबद्दल सविस्तर माहिती बघुयात – 

JIO चा 152 रुपयांचा प्लॅन

 या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जात आहे. या प्लॅनमध्ये दररोज 0.5GB डेटा दिला जात आहे. संपूर्ण वैधता दरम्यान 14 GB डेटा दिला जात आहे. FUP डेटा संपल्यानंतर, 64 Kbps चा वेग उपलब्ध होईल. यासोबतच तुम्हाला प्रत्येक नेटवर्कवर कॉलिंगसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. 

याशिवाय, या प्लॅनमध्ये तुम्हला 300 SMS दिले जातील. तसेच, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश दिला जाईल. मात्र हे लक्षात घ्या की, हा केवळ JioPhone चा प्लॅन आहे. केवळ JioPhone युजर्ससाठी हा प्लॅन उपलब्ध आहे.

कंपनीचे इतर स्वस्त प्लॅन 

याशिवाय कंपनीकसे अनेक प्लॅन्स आहेत, जे खूप स्वस्त आहेत. यामध्ये 75, 91, 125, 186, 223 आणि 895 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. हे सर्व प्लॅन्स JioPhone वापरकर्त्यांसाठी आहेत. जर तुम्ही एक JioPhone युजर असाल तर तुम्हाला खूप स्वस्तात रिचार्ज करण्यासाठी बरेच पर्याय मिळतात. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo