How to: फोनमध्ये 5G नेटवर्क नीट येत नाही का? ‘ही’ सेटिंग बदलताच रॉकेटच्या वेगाने चालेल इंटरनेट। Tech News 

How to: फोनमध्ये 5G नेटवर्क नीट येत नाही का? ‘ही’ सेटिंग बदलताच रॉकेटच्या वेगाने चालेल इंटरनेट। Tech News 
HIGHLIGHTS

5G क्षेत्रात असूनही अनेक शहरांमधील लोक अजूनही 5G सर्व्हिसचा योग्प्रकारे लाभ घेऊ शकत नाहीत.

तुमच्या फोनमध्ये पुढील सेटिंग केल्यास 5G स्पीडमध्ये इंटरनेट चालेल.

Android आणि iPhone मध्ये 5G नेटवर्क स्पीड 'अशा'प्रकारे वाढवा.

आता जवळपास संपूर्ण देशात 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. देशातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज Airtel आणि Jio ने देशाच्या अनेक भागांमध्ये त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. मात्र, 5G च्या क्षेत्रात असूनही अनेक शहरांमधील लोक अजूनही 5G सर्व्हिसचा योग्य प्रकारे लाभ घेऊ शकत नाहीत. जर तुमच्या फोनमध्ये 5G सेवा योग्यरित्या उपलब्ध नसेल, तर त्यामागील कारण नेटवर्क समस्या नसून तुमच्या फोनची सेटिंग असू शकते.

सध्या अनेक युजर्सची नेटवर्क स्पीड स्लो असल्याची तक्रार आहे. अनेक वेळा चुकीच्या सेटिंग्जमुळे, नेटवर्कमध्ये समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काही बदल करावे लागतील. तुम्ही तुमच्या फोनमध्ये पुढील काही सेटिंग केल्यास तुम्हाला लगेच रॉकेट सारखी 5G नेटवर्क स्पीड मिळू लागेल.

5g network

तुमच्या Android फोनमध्ये 5G नेटवर्क स्पीड ‘अशा’प्रकारे वाढवा.

  • सर्वप्रथम 5G नेटवर्क स्पीड चेक करावी लागेल. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. – येथे Wi-Fi and Network चा पर्याय निवडा. – आता ‘सिम आणि नेटवर्क’ ऑप्शनवर क्लिक करा. – आता ‘Preferred Network’ पर्यायावर जा. – येथे तुम्हाला एक सूची दिसेल ज्यामध्ये 5G नेटवर्क दाखवले जाईल. तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा. – आता ‘नेटवर्क आणि इंटरनेट’ ऑप्शनवर क्लिक करा. – आता तुम्हाला सिम पर्यायावर क्लिक करावे लागेल. – यानंतर आता तुम्हाला Preferred Network वर टाइप करा.- यानंतर 5G चा पर्याय निवडावा लागेल. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर फोन परत एकदा रीस्टार्ट करा. अशाप्रकारे तुमच्या फोनमध्ये 5G स्पीडसह कामे होतील.

iPhone मध्ये 5G नेटवर्क स्पीड ‘अशा’प्रकारे वाढवा.

  • सर्वप्रथम फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. – आता मोबाईल डेटा पर्यायावर क्लिक करा. – आता तुम्हाला डिस्प्लेमध्ये डेटा रोमिंग, डेटा मोड आणि व्हॉइस आणि डेटासह अनेक ऑप्शन्स दिसतील. – या लिस्टमध्ये तुम्हाला व्हॉइस आणि डेटावर टॅप करावे लागेल. – जर तुम्हाला 5G चा पर्याय दिसत असेल. म्हणजेच तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो.
  • नेटवर्क स्पीड वाढवण्यासाठी सर्वप्रथम iPhone मधील सेटिंगमध्ये जा. – आता Cellular Network वर क्लिक करा. येथे सेल्युलर डेटा पर्याय निवडावा लागेल.- आता व्हॉईस आणि डेटा ऑप्शनवर टॅप करा. आता शेवटच्या टप्प्यात तुम्हाला 5G चा पर्याय निवडावा लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तुमचा iPhone 5G स्पीडमध्ये रॉकेटच्या स्पीडने काम करेल.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo