How to: फोनवर सतत येणाऱ्या स्पॅम कॉल्सने वैतागलात? ‘अशा’ प्रकारे ब्लॉक करा, बघा महत्त्वाच्या Tips। Tech News 

HIGHLIGHTS

तुम्ही सुद्धा दिवसभर येणाऱ्या प्रमोशनल कॉल्स आणि मॅसेजेसने त्रासलात?

स्पॅम कॉल आणि मॅसेज ब्लॉक करण्याचे अनेक मार्ग आहेत.

सतत त्रास देणारे कॉल्स थांबवण्यासाठी DND देखील ऍक्टिव्ह करता येईल.

How to: फोनवर सतत येणाऱ्या स्पॅम कॉल्सने वैतागलात? ‘अशा’ प्रकारे ब्लॉक करा, बघा महत्त्वाच्या Tips। Tech News 

जर तुम्हालाही सततच्या स्पॅम कॉल्स आणि मॅसेजमुळे वैताग आलाय, तर काळजी करू नका. असे काही विशेष उपाय उपलब्ध आहेत, ज्यामुळे हे कॉल्स आणि मॅसेज टाळण्यास मदत होईल. तुम्ही सुद्धा दिवसभर येणाऱ्या प्रमोशनल कॉल्स आणि मॅसेजेसने त्रासले असाल, तर हे कॉल ब्लॉक करण्याचे अनेक मार्ग आहेत. यासाठी आम्ही तुम्हाला छोट्या पण काही महत्त्वाच्या Tips सांगणार आहोत, जे फॉलो करून तुम्ही प्रमोशनल मेसेज आणि कॉल्स सहज टाळू शकता.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

‘अशा’प्रकारे Spam Calls पासून सुटका करा.

सर्वप्रथम तुम्हाला फोनमधील मेसेज बॉक्समध्ये जाऊन 1909 वर FULLY BLOCK पाठवावे लागेल. तुम्ही मेसेज पाठवताच तुम्हाला एक मेसेज येईल की, तुमचा Airtel/Jio/Vi मोबाईल नंबर पूर्णपणे नोंदणीकृत झाला आहे. एवढेच नाही तर, पुढील 24 तासांत तुमच्या मोबाइल नंबरवरील प्रमोशनल कॉल्स आणि मेसेज बंद केले जातील.

सतत त्रास देणारे कॉल्स थांबवण्यासाठी DND देखील ऍक्टिव्ह करता येईल. पुढील प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.

jio airtel vi dnd tips

Airtel DND

Airtel DND ऍक्टिव्ह करण्यासाठी Airtel युजर सर्वप्रथम airtel.in/airtel-dnd वर ​​जा, या साइटवर तुम्हाला तुमचा एअरटेल नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर, तुम्हाला ब्लॉक करायच्या असलेल्या श्रेणी निवडा.

Jio DND

सर्वप्रथम तुम्हाला My Jio App फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल, App इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा. यानंतर App च्या सेटिंग्जमध्ये जा, येथे तुम्हाला सर्व्हिस सेटिंग्जमध्ये डू नॉट डिस्टर्ब ऑप्शन दिसेल. येथे तुम्हाला वेगवेगळ्या श्रेणी दिसतील, ज्या श्रेणीसाठी तुम्हाला DND (डू नॉट डिस्टर्ब) सेवा सक्रिय करायची आहे, ती तुम्ही याठिकाणी ऍक्टिव्ह करू शकता.

VI DND

जर तुम्ही Vodafone Idea चे यूजर असाल तर DND सक्रिय करण्यासाठी तुम्हाला discover.vodafone.in/dnd वर ​​जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि नाव टाकावे लागेल. यानंतर, तुम्हाला ब्लॉक करायच्या असलेल्या श्रेणी निवडा.

अशाप्रकारे तुम्ही अगदी सहजरित्या दिवसभर सतत येणाऱ्या कॉल्सपासून स्वतःची सुटका करू शकता. वर सांगितलेले दोन्ही उपाय अगदी उपयुक्त आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo