HATHWAY LIFELONG BINGE: लॉन्च झाला नवीन धमाकेदार अनलिमिटेड ब्रॉडबँड प्लान, किंमत आहे फक्त RS 399

Updated on 05-Jul-2019

Hathway ने एक नवीन Hathway Lifelong Binge ऑफर कंपनीच्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठी लॉन्च केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट ऑफर केला जात आहे आणि यासाठी तुम्हाला Rs 399 प्रतिमाह द्यावे लागतील. या नवीन ऑफर मध्ये तुम्हाला 50Mbps चा इंटरनेट स्पीड मिळत आहे. तसेच यूजर्सना यासाठी एकच Rs 1,999 ची नॉन-रिफंडेबल किंमत रजिस्ट्रेशन साठी द्यावी लागेल.  

हा प्लान जवळपास एका महिन्यानंतर आला आहे आणि याच्या एक महिना आधीच कंपनीने इतर प्लान पण लॉन्च केला होता, जो जवळपास Rs 449 मध्ये येतो. यात पण तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट ऑफर केली जात आहे. या प्लान मध्ये तुम्हाला Rs 100 चा डिस्काउंट पण दिला जात आहे. हा तुम्हाला ‘Life Set Hai’ ऑफर अंतर्गत मिळत आहे.  

टेलीकॉम टॉकचा एक रिपोर्ट पहिला तर त्यानुसार हा प्लान फक्त हैदराबादच्या यूजर्स साठीच सादर केला गेला आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 50Mbps च्या स्पीड सह अनलिमिटेड वेब सर्फिंग मिळते. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला कोणतीही FUP लिमिट देण्यात आलेली नाही. याचा अर्थ असा कि निर्धारित डेटा संपल्यावर पण तुम्हाला स्पीड लिमिट मध्ये कोणतीही कमी दिसणार नाही.  

अलीकडेच Hathway ने अजून एक प्लान पण सादर केला होता, जो Rs 549 मध्ये येतो. हैदराबाद मध्ये हॅथवे सहा ब्रॉडबँड प्लान्स ऑफर करत आहे आणि हे सर्व FUP विना ऑफर केले जातात. सर्वात स्वस्त प्लान Rs 349 मध्ये येतो जो 50 Mbps स्पीड ऑफर करतो. 

तसेच Rs 399 आणि Rs 499 मध्ये गोल्ड आणि ब्लास्ट पर्याय उपलब्ध आहेत जे मंथली रेंटल सह येतात. तसेच सुप्लेर प्लान्स पण उपलब्ध आहेत जे 25 Mbps चा स्पीड ऑफर करतात आणि प्रतिमाह Rs 349 आणि Rs 399 देऊन हे वापरता येतात. लाइटिंग प्लान मध्ये यूजर्सना वेगवेगळ्या टायर्स मध्ये Rs 349, Rs 399 आणि Rs 449 मध्ये प्रतिमाह 75 Mbps चा स्पीड मिळतो तसेच रॅपिड प्लान्स मध्ये Rs 349, Rs 399 आणि Rs 499 च्या किंमतीत 80 Mbps ऑफर केला जातो. 

तसेच हॅथवेच्या पोर्टफोलियो मध्ये फ्रीडम आणि थंडर प्लान्स पण आहेत जे क्रमश: 100 Mbps आणि 125 Mbps स्पीड ऑफर करतात. 100 Mbps च्या स्पीडचे प्लान तीन टायर्स मध्ये Rs 499, Rs 549 आणि Rs 599 च्या किंमतीत उपलब्ध आहेत. थंडर प्लान्स बद्दल बोलायचे तर हे 125 Mbps स्पीड सह येतात आणि तीन टायर्स मध्ये Rs 549, Rs 599, आणि Rs 649 च्या किंमतीत उपलब्ध आहेत. Hathway सोबतच सहा महिने आणि वार्षिक कालावधीसाठी पण सब्सक्रिप्शन प्लान ऑफर करते. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :