हर घर JioFiber ! ‘या’ वापरकर्त्यांना 15 दिवसांसाठी इंटरनेट मोफत, ‘या’ तारखेपर्यंत संधी

हर घर JioFiber ! ‘या’ वापरकर्त्यांना 15 दिवसांसाठी इंटरनेट मोफत, ‘या’ तारखेपर्यंत संधी
HIGHLIGHTS

हर घर तिरंगा, हर घर JioFiber

ग्राहकांना 15 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल

Jio चा 1 रुपयांचा प्लॅन देखील क्लब करण्यात आला आहे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रिलायन्स JIO ने आपल्या वापरकर्त्यांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या अनेक ऑफर जाहीर केल्या आहेत. Jio ने आपल्या JioFiber प्लॅन्सची विक्री वाढवण्यासाठी एक उत्तम ऑफर सादर केली आहे. ज्याला कंपनीने 'हर घर तिरंगा, हर घर JioFiber' असे नावही दिले आहे. या ऑफर अंतर्गत, JioFiber पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅनच्या ग्राहकांना 15 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे. बघुयात ऑफर… 

हे सुद्धा वाचा : Jio Phone 5G : Jio चा 5G फोन लवकरच लाँच होणार, किंमत असेल इतकी कमी

 'हर घर JioFiber' ऑफर

'हर घर तिरंगा, हर घर  JioFiber' नवीन JioFiber कनेक्शन खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022 दरम्यान Jio Fiber पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅन खरेदी केल्यास तुम्हाला 15 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. म्हणजेच तुमचा प्लॅन आणखी 15 दिवस टिकेल. मात्र, त्याचे ऍक्टिव्हेशन 19 ऑगस्ट 2022 पूर्वी केले जाणे बंधनकारक आहे.

ही ऑफर फक्त  499, 599, 799 आणि 899 रुपयांच्या प्लॅनसाठी लागू आहे. ही ऑफर फक्त 6 किंवा 12 महिन्यांच्या प्लॅनवर लागू आहे. तसेच, Jio चे आताचे JioFiber वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकत नाहीत.

Jio कडून 750 रुपयांचा प्लॅन लाँच 

Jio चा नवीन 750 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांना 90 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन लाभ देतो. हा Jio चा पहिला प्लॅन आहे जो पूर्ण तीन महिन्यांसाठी 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. यासोबतच, Jio चा 1 रुपयांचा प्लॅन देखील क्लब करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना 90 दिवसांसाठी 100MB डेटा ऑफर केला जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo