Excitel ने लाँच केला खास प्लॅन, Unlimited डेटासह 12 OTT आणि 550 TV चॅनेल मिळतील Free! Tech News 

HIGHLIGHTS

सुप्रसिद्ध ब्रॉडबँड ऑफर करणारी कंपनी Excitel ने Disney+ Hotstar शी हातमिळवणी केली.

ग्राहकांना प्लॅनमध्ये 12 OTT प्लॅटफॉर्मचा मोफत ऍक्सेस देखील मिळतो.

हा प्लॅन सुमारे 550 लाइव्ह TV चॅनेलने सुसज्ज आहे.

Excitel ने लाँच केला खास प्लॅन, Unlimited डेटासह 12 OTT आणि 550 TV चॅनेल मिळतील Free! Tech News 

सध्या OTT प्लॅटफॉर्म्सची क्रेझ बघता देशातील सुप्रसिद्ध ब्रॉडबँड ऑफर करणारी कंपनी Excitel ने Disney+ Hotstar शी हातमिळवणी केली आहे. या नवीन उपक्रमाद्वारे कंपनी आपल्या नवीन आणि विद्यमान ग्राहकांना या सेवेचा लाभ देत आहे. Excitel ने हा ब्रॉडबँड प्लॅन फक्त 599 रुपये प्रति महिना किमतीत सादर केला आहे. डिजनी + हॉटस्टारचा मोफत ऍक्सेस ग्राहकांना मिळावा यासाठीही हे केले गेले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना काय मिळेल ते बघुयात.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: तारीख नोट करा! Vivo Y200 5G ची लाँच डेट जाहीर, Affordable किमतीत येईल का फोन? Tech News

excitel plan user

Excitel चा 599 रुपयांचा broadband Plan

Excitel च्या 599 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ग्राहकांना 400Mbps चा स्पीड मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा मिळतो. त्याबरोबरच, ग्राहकांना प्लॅनमध्ये 12 OTT प्लॅटफॉर्मचा मोफत ऍक्सेस देखील मिळतो. या प्लॅनसह Disney+ Hotstar चा स्टॅंडर्ड ऍक्सेस देखील दिला जात आहे. एवढेच नाही, तर हा प्लॅन सुमारे 550 लाइव्ह TV चॅनेलने सुसज्ज आहे.

DISNEY+HOTSTAR

हा प्लॅन कंपनीच्या नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. जर तुम्हाला हा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही आत्ताच खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये मिळणारे उपलब्ध बेनिफिट्स रिलायन्स Jio, Airtel आणि इतर कोणत्याही कंपनीच्या प्लॅनला टक्कर देत आहेत.

तसेच, कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर असाच एक प्लॅन सूचीबद्ध केला आहे. केबल कटर असे या प्लॅनचे नाव देण्यात आले आहे. या प्लॅनची किंमत दरमहा 592 रुपये आहे. परंतु लक्षात घ्या की, यासाठी तुम्हाला वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo