अरे बापरे ! अमर्यादित डेटा आणि मोफत OTT सबस्क्रिप्शनसह प्लॅन्स आज होणार बंद, त्वरित रिचार्ज करा…

अरे बापरे ! अमर्यादित डेटा आणि मोफत OTT सबस्क्रिप्शनसह प्लॅन्स आज होणार बंद, त्वरित रिचार्ज करा…
HIGHLIGHTS

BSNL द्वारे तीन प्लॅन्स आज होणार बंद

अमर्यादित डेटा आणि OTT सब्स्क्रिप्शनसह हे प्लॅन्स येतात.

या प्लॅन्सचा लाभ घ्याचा असेल तर त्वरित रिचार्ज करा.

भारत संचार निगम लिमिटेड BSNL द्वारे त्यांच्या फायबर ब्रॉडबँड सेवेसाठी BSNL Bharat Fibre अनेक प्लॅन्स ऑफर करतो. तुम्ही BSNL च्या ब्रॉडबँड सेवा वापरत असाल किंवा त्याच्या व्हॅल्यू प्लॅनसह रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कंपनीने आपले तीन ब्रॉडबँड प्लॅन हटवण्याचा म्हणजेच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा : अप्रतिम ऑफर ! 75 इंच 4K QLED TVवर मिळतोय तब्बल 50 हजार रुपयांचा डिस्काउंट

कंपनीकडून बंद करण्यात आलेले प्लॅन्स विशेष प्रसंगी मर्यादित काळासाठी सादर करण्यात आले होते. जर तुम्ही आज या प्लॅनसह रिचार्ज केले नाही तर तुम्हाला त्यांचा लाभ पुन्हा मिळणार नाही. या ब्रॉडबँड प्लॅनची ​​किंमत फक्त रु. 275 पासून सुरू होते आणि रु. 775 पर्यंत जाते. यामध्ये अनेक OTT फायदे देखील उपलब्ध आहेत.

OTT बेनिफिट्ससह येणार प्लॅन 

कंपनी 775 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन देखील बंद करणार आहे, जो 2TB मासिक डेटा ऑफर करतो. 775 रुपयांचा प्लॅन 75 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि अनेक OTT बेनिफिट्ससह 150Mbps स्पीड देतो. Disney + Hotstar, Lionsgate, Hungama, SonyLIV, ZEE5, Voot आणि YuppTV चे सदस्यत्व प्लॅनसह उपलब्ध आहे. याशिवाय, पहिल्या महिन्याच्या रेंटमध्ये 500 रुपयांची सूट उपलब्ध आहे आणि हे सर्व फायदे कमी किंमतीत मिळू शकतात.

 275 रुपयांचे दोन ब्रॉडबँड प्लॅन

BSNL आजपासून रु. 275 चे दोन ब्रॉडबँड प्लॅन बंद करणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सांगण्यात आले आहे की, भारत फायबरचे 275 रुपयांचे प्लॅन 15 नोव्हेंबरपासून बंद केले जातील. हे दोन्ही प्लॅन 3.3TB च्या कॅपसह संपूर्ण महिन्यासाठी अमर्यादित डेटा ऑफर करतात. 

दोन्ही प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग कनेक्शनचा लाभ देखील उपलब्ध आहे. समान किंमत असलेल्या दोन प्लॅन्सच्या फक्त स्पीडमध्ये फरक आहे. यापैकी एक 30Mbps आणि दुसरा 60Mbps ची कनेक्शन स्पीड देतो. हे दोन्ही प्लॅन्स 75 दिवसांच्या वैधतेसह येतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo