BSNL ग्राहकांना झटका ! बंद केले दोन अप्रतिम बेनिफिट्ससह येणारे स्वस्त प्लॅन्स

BSNL ग्राहकांना झटका ! बंद केले दोन अप्रतिम बेनिफिट्ससह येणारे स्वस्त प्लॅन्स
HIGHLIGHTS

BSNL ने आपले दोन स्वस्त प्लॅन 1 जानेवारीपासून बंद केले आहेत.

हे प्लॅन्स 2022 च्या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी सादर करण्यात आले होते.

या दोन्ही प्लॅन्समध्ये एकूण 75 दिवसांची वैधता मिळत होती.

भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने 1 जानेवारी 2023 पासून ग्राहकांसाठी अत्यंत स्वस्त ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. या प्लॅनमध्ये रु. 275 आणि रु. 775 च्या दोन प्लॅन्सचा समावेश आहे. हे प्लॅन्स 2022 च्या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी सादर करण्यात आले होते. BSNL च्या या प्लॅन्समध्ये 100Mbps च्या स्पीडने इंटरनेट सुविधा देण्यात आली होती. तसेच, वापरकर्त्यांना 3300TB पर्यंत डेटा आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा होती. या प्लॅनसह 75 दिवसांची वैधता उपलब्ध होती.

 BSNL चे हे प्लॅन गेल्या महिन्यातच काढले जाणार होते, परंतु कंपनीने त्याची एक्सपायरी डेट वाढवली होती. याआधी कंपनी हे प्लॅन्स कायमस्वरूपी बनवू शकते असे सांगितले जात होते. मात्र, 1 जानेवारीपासून हे प्लॅन्स बंद करण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा :  त्वरा करा ! 33 हजार किमतीच्या Google Pixel 6a वर 21,000 सूट, 'अशा'प्रकारे करा ऑर्डर 

275 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळत होते 'हे' बेनिफिट्स: 

या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये दीर्घ वैधता आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध होती. BSNL च्या रु. 275 च्या दोन्ही प्लॅनसह, एकूण 3.3TB डेटा उपलब्ध होता, जो 75 दिवसांच्या वैधतेसह आला होता. 275 रुपयांच्या एका प्लॅनमध्ये 30Mbps इंटरनेट स्पीड आणि दुसऱ्या प्लॅनमध्ये 60Mbps इंटरनेट स्पीड उपलब्ध होता. प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग देखील देण्यात आले होते.

 775 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये मिळत होते 'हे' बेनिफिट्स : 

 775 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, 75 दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन येत होता. प्लॅनमध्ये 100Mbps च्या स्पीडने इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. वापरकर्त्यांना 3300 TB एकूण हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळत असे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध होते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo