BSNL 30 Days Plans: संपूर्ण एका महिन्याच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स, भरपूर डेटासह मिळतील Unlimited बेनिफिट्स। Tech News 

HIGHLIGHTS

BSNL ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची टेलेकॉम सेवा कंपनी आहे.

BSNL च्या 30 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स खूप प्रभावी आहेत.

या प्लॅन्समध्ये अमर्यादित कॉलिंगसह अमर्यादित डेटा देखील उपलब्ध

BSNL 30 Days Plans: संपूर्ण एका महिन्याच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स, भरपूर डेटासह मिळतील Unlimited बेनिफिट्स। Tech News 

भारत संचार निगम लिमिटेड BSNL ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची टेलेकॉम सेवा कंपनी आहे. कंपनीकडे सध्या सर्वात मोठे वायरलाइन नेटवर्क आहे आणि ब्रॉडबँड क्षेत्रातही BSNL लोकप्रिय आहे. मात्र, सध्या BSNL ने आपले 4G नेटवर्क देशभरात सुरू केलेले नाही. तरीही, कंपनीचे प्लॅन्स खूप प्रभावी आहेत. कमी किमतीत हे प्लॅन्स अनेक अप्रतिम लाभांसह येतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला BSNL च्या 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. बघा यादी-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

BSNL चा 199 रुपयांचा प्लॅन

आम्ही BSNL च्या 199 रुपयांचा प्लॅन 2GB दैनिक डेटा आणि 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना प्लॅनसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100SMS चे लाभ मिळतात. या प्लॅनसह इतर कोणतेही फायदे उपलब्ध नाहीत. लक्षात घ्या की, हे एक BSNL चे प्लॅन व्हाउचर आहे.

BSNL Plan
BSNL Plan

BSNL चा 269 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 269 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्याला दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. त्याच वेळी, या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMSचा लाभ मिळतो. तसेच, प्लॅनमध्ये Hello Tunes, इरॉस नाऊ एंटरटेनमेंट, चॅलेंज एरिना गेम्स, लिसन पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाइल गेम सर्व्हिस, लोकधुन आणि झिंगचा ऍक्सेस उपलब्ध आहे.

BSNL चा 299 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला संपूर्ण महिन्यांचो म्हणजेच 30 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा आणि 100 SMS/दिवस इतके बेनिफिट मिळतात. मात्र, यामध्ये इतर कोणताही लाभ मिळणार नाही. दैनिक 3GB डेटा संपल्यावर इंटरनेट सुरु राहील, पण त्याचा वेग 80Kbps इतका कमी होईल. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये कोणतेही अतिरिक्त फायदे मिळत नाही.

BSNL चा 398 रुपयांचा प्लॅन

जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर तुम्ही 398 रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. कारण हा प्लॅन संपूर्ण 30 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित डेटा लाभ ऑफर करतो. यासोबतच, तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS चा लाभ देखील मिळतो. जर तुम्ही या प्लॅनसह रिचार्ज केला तर, तुम्हाला ऑफीसचे काम करताना सतत डेटा संपण्याची काहीही काळजी करण्याची गरज नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo