महागाईचा झटका: BSNL चे ‘हे’ स्वस्त प्लॅन महागले, मिळणार कमी वैधता

महागाईचा झटका: BSNL चे ‘हे’ स्वस्त प्लॅन महागले, मिळणार कमी वैधता
HIGHLIGHTS

BSNLने आपल्या स्वस्त प्लॅन्सचे दर वाढवले.

प्लॅन्समध्ये पूर्वीपेक्षा कमी वैधता मिळणार आहे.

मात्र, इतर सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच मिळतील.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने अलीकडेच तीन नवीन प्री-पेड प्लॅन लाँच केले आहेत. त्याबरोबरच, आता कंपनीने आपले अनेक प्री-पेड प्लॅन्स एकाच वेळी महाग केले आहेत. टेलिकॉम टॉकने सर्वप्रथम ही माहिती दिली आहे. आता BSNL ने एकाच वेळी आपल्या तीन प्री-पेड प्लॅनमध्ये उपलब्ध बेनिफिट्स कमी केली आहेत. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात या प्लॅन्सबद्दल…

हे सुद्धा वाचा : 7700mAh बॅटरी आणि 11-इंच डिस्प्लेसह येणार Lenovo चा कूल टॅब, जाणून घ्या किंमत

BSNL च्या 99 रुपयांच्या प्लॅनचे नवीन फायदे

BSNL च्या 99 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये पूर्वी अमर्यादित कॉलिंगसह 22 दिवसांची वैधता असे. पण आता या प्लॅनची ​​वैधता 18 दिवसांची झाली आहे. म्हणजेच तुम्ही 4 दिवसांनी वैधता कमी केली आहे. शिवाय, इतर सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील. 

118 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 118 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 500 MB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. आता नवीन बदलामध्ये या प्लॅनची वैधता 20 दिवसांची झाली आहे, जी पूर्वी 26 दिवसांची होती. म्हणजेच, या प्लॅनची ​​किंमत देखील सुमारे 4.53 रुपयांनी वाढली आहे.

319 रुपयांच्या प्लॅनचे नवीन फायदे

BSNL चा 319 रुपयांचा प्लॅन 75 दिवसांच्या वैधतेसह येत असे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 300 SMS आणि 10 GB डेटा उपलब्ध आहे. आता या प्लॅनची वैधता 65 दिवसांची झाली आहे. म्हणजेच हा प्लॅनही जवळपास 4.25 रुपयांनी महाग झाला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo