2,022 रु. मध्ये BSNLकडून नवीन प्रीपेड प्लॅन लाँच, मिळेल एकूण 75 GB डेटा आणि दीर्घ वैधता

2,022 रु. मध्ये BSNLकडून नवीन प्रीपेड प्लॅन लाँच, मिळेल एकूण 75 GB डेटा आणि दीर्घ वैधता
HIGHLIGHTS

BSNL ने 2022 रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला

BSNL च्या नवीन प्लॅनमध्ये 75GB डेटा मिळणार आहे

प्लॅनमध्ये 300 दिवसांची वैधता आहे

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची ​​किंमत 2,022 रुपये आहे. या प्रीपेड प्लॅनसह, कंपनी अशा लोकांना लक्ष्य करत आहे, ज्यांना दीर्घ कालावधीसाठी भरपूर डेटा असलेला प्लॅन हवा आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनबद्दल सविस्तर…

हे सुद्धा वाचा : Ek Villain Returns : फ्लॉप होणार का चित्रपट ? बघा आतापर्यंत चित्रपटाने किती कमाई केली…

BSNL RS 2022 प्रीपेड प्लॅन

BSNL दरमहा 75GB डेटासह 2,022 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत  आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना 300 दिवसांची सेवा वैधता, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ मिळेल. दरमहा 75GB डेटा वापरल्यानंतर, वेग 40 Kbps पर्यंत घसरतो. मात्र, हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, डेटा फक्त पहिल्या 60 दिवसांसाठी येतो. त्यानंतर, तुम्हाला डेटा हवा असल्यास, तुम्हाला डेटा व्हाउचरने रिचार्ज करावे लागेल.

हे एक मनोरंजक डेटा व्हाउचर आहे, जे BSNL ने 'आझादी का अमृत महोत्सव' PV_2022 च्या प्रस्तावानुसार लाँच  केले आहे. ही ऑफर 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे, त्यामुळे तुम्हाला या व्हाउचरचा लाभ घ्यायचा असल्यास, या महिन्याच्या आत रिचार्ज करावे लागेल. 

BSNL लवकरच 4G नेटवर्क लॉन्चिंगवर देखील काम करत आहे. यानंतर, BSNL वापरकर्त्यांना जबरदस्त 4G कव्हरेज आणि गती प्रदान करू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo