BSNL Diwali Offer: ‘या’ तीन लोकप्रिय प्लॅनसह कंपनी देतेय Extra 3GB डेटा Free, मिळतील अनेक आकर्षक बेनिफिट्स
सरकारी दूरसंचार कंपनी BSNLने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी ऑफर आणल्या आहेत.
BSNL च्या 299 रुपयांच्या प्लॅन आणि 398 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा दिला जात आहे.
फक्त BSNL सेल्फकेअर App द्वारे रिचार्ज केल्यास ऑफरचा लाभ मिळेल.
सरकारी दूरसंचार कंपनी BSNLने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी ऑफर आणल्या आहेत. अलीकडेच लोकप्रिय टेलिकॉम कंपनीने 251 रुपयांच्या व्हाउचरसह 3GB अतिरिक्त डेटा ऑफर जाहीर केली होती. त्यानंतर, आता BSNL दिवाळी बोनान्झा ऑफर अंतर्गत, कंपनी त्यांच्या इतर दोन प्लॅनसह मोफत अतिरिक्त डेटा देखील देत आहे. होय, चला तर मग संपूर्ण तपशील जाणून घेऊयात.
SurveyBSNL च्या 299 रुपयांच्या प्लॅन आणि 398 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा दिला जात आहे.
BSNL ची दिवाळी बोनान्झा ऑफर
Celebrate Diwali with #BSNLSelfCareApp and get 3GB extra data for voucher ₹299. Enjoy unlimited browsing, streaming, and sharing this #FestiveSeason.#RechargeNow: https://t.co/KUu7rPO1F5 (For NZ, EZ& WZ), https://t.co/5AAj1chxOo (For SZ)#BSNL #BSNLDiwaliBonanza #G20India pic.twitter.com/i0Zda4tbHA
— BSNL India (@BSNLCorporate) November 3, 2023
BSNL India ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच Twitter खात्यावरून ट्विट करून आणखी व्हाउचरसह उपलब्ध ऑफरची माहिती दिली आहे. नुकतेच कंपनीने ट्विट केले की, BSLN SelfCare App द्वारे 299 रुपयांचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला 3GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह, दररोज 3GB डेटा आणि मोफत SMS मिळतात. ज्याची वैधता संपूर्ण 30 दिवस म्हणजे एक महिना आहे.
Let #BSNL illuminate your phone this #Diwali!
— BSNL India (@BSNLCorporate) November 4, 2023
Recharge through the #BSNLSelfCareApp and receive an additional 3GB data on the ₹398 voucher.#RechargeNow: https://t.co/okvB4lp8LT (For NZ, EZ& WZ), https://t.co/xVEZ37Z8G9 (For SZ)#BSNLDiwaliBonanza #G20India #DiwaliDiscounts pic.twitter.com/4HCAdgRcDf
त्याबरोबरच, कंपनीने ट्विट करून घोषणा केली आहे की, 398 रुपयांचा रिचार्ज केल्यावर यूजर्सला 3GB अतिरिक्त डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 120GB डेटा आणि दररोज 100 मोफत SMS उपलब्ध आहेत. या प्लॅनची वैधता देखील पूर्ण 30 दिवस म्हणजे 1 महिना आहे. ही ऑफर देखील फक्त BSNL सेल्फकेअर App द्वारे रिचार्ज केल्यावर उपलब्ध असेल. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी BSNL च्या अधिकृत साईटला भेट द्या.
Recharge on the #SelfCareApp and grab 3GB bonus data on ₹499 voucher. Connect with loved ones and share your festive moments without data worries.#RechargeNow: https://t.co/Rk5v3XC6jw (For NZ, EZ& WZ), https://t.co/BiPcjWu8lY (For SZ)#BSNL #BSNLDiwaliBonanza #G20India pic.twitter.com/5RSjqLDBDv
— BSNL India (@BSNLCorporate) November 5, 2023
त्यानंतर, काही काळापूर्वी कंपनीने आणखी एक ट्विट केले आहे की, #SelfCareApp वर रिचार्ज करा आणि ₹499 च्या व्हाउचरवर 3GB बोनस डेटा मिळवा. प्रियजनांशी कनेक्ट व्हा आणि डेटाच्या काळजीशिवाय तुमचे सणाचे क्षण शेअर करा. म्हणजेच या तिन्ही रिचार्जवर तुम्हाला अतिरिक्त 3GB डेटा अगदी मोफत मिळणार आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile