सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कमी किमतीत OTT प्लॅटफॉर्म्सचे प्लॅन्स घेणे आता शक्य झाले आहे. कारण, सरकारी कंपनी BSNL ने तीन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. कंपनीने हे प्लॅन Cinemaplus OTT Entertainment Packs नावाने लाँच केले आहेत. यासाठी BSNL ने Lionsgate, ShemarooMe, Hungama आणि EpicOn सारख्या OTT साइट्ससोबत पार्टनरशिप केली आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
BSNL च्या नव्या OTT प्लॅन्सची किमंत
BSNL CinemaPlus Starter Pack: स्टार्टर पॅक सध्या 49 रुपये सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. यामध्ये शेमारू, हंगामा, लायन्सगेट आणि EPIC On च्या OTT सेवांचा समावेश आहे. मात्र, या प्लॅनची मूळ किंमत 99 रुपये आहे.
BSNL CinemaPlus Full Pack: 199 रुपये किंमतीचा, हा फुल पॅक ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV आणि Hotstar सह येणार आहे.
BSNL CinemaPlus Premium Pack: हा एक प्रीमियम पॅक आहे, जो 249 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV, Shemaroo, Hungama, Lionsgate आणि Hotstar वरील कंटेंट ऑफर करतो.
यावरून तुम्हाला समजले असेल की, BSNL तुम्हाला वेगवेगळ्या OTT कंटेंट प्रोव्हायडर कॉम्बिनेशनसह तीन पॅक ऑफर करणार आहे. निवडलेल्या पॅकवर आधारित सर्व OTT चे सबस्क्रिप्शन तुमच्या फायबर कनेक्शनच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सक्रिय केले जातील. तर, प्लॅन्सची किंमत तुमच्या बिलात सदस्यता शुल्क म्हणून ऍड केली जाईल. अधिक माहितीसाठी BSNL च्या अधिकृत साईटला भेट द्या.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile