56 दिवसांच्या वैधतेसह अवघ्या 3 रुपयांत मिळेल 1GB डेटा, Jio-Airtel सुद्धा या प्लॅनपुढे फेल

56 दिवसांच्या वैधतेसह अवघ्या 3 रुपयांत मिळेल 1GB डेटा, Jio-Airtel सुद्धा या प्लॅनपुढे फेल
HIGHLIGHTS

BSNLचा सर्वोत्तम प्लॅन खास तुमच्यासाठी

अवघ्या 3 रुपयांत मिळेल 1 GB डेटा

प्लॅनमध्ये एकूण 56 दिवसांची वैधता उपलब्ध

Reliance Jio, Vodafone-Idea आणि Airtel सारख्या कंपन्यांकडे प्रीपेड प्लॅनची ​​मोठी यादी असेल, परंतु किंमतीच्या बाबतीत, या कंपन्या सरकारी मालकीची कंपनी BSNL शी स्पर्धा करू शकणार नाहीत. रिचार्ज प्लॅनच्या लांबलचक यादीमध्ये, आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. BSNLच्या एका खास प्लॅनमध्ये अवघ्या 3 रुपयांत तुम्‍हाला 1 GB डेटाची सुविधा मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात या रिचार्ज प्लॅनबद्दल सविस्तर माहिती…  

BSNLचा 347 रुपयांचा प्लॅन

 BSNLचा हा प्लॅन इतर कंपन्यांना चांगलीच टक्कर देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 56 दिवसांची वैधता दिली जाते. यासोबत दररोज 2 GB हायस्पीड डेटा दिला जात आहे. म्हणजेच, यामध्ये एकूण 112 GB डेटा मिळतो. अशा प्रकारे, जर आपण 1 GB डेटाची किंमत काढली, तर ती सुमारे 3 रुपये (347÷112) आहे. डेटा व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 100 SMS आणि गेमिंग सेवा देखील मिळेल.

हे सुद्धा वाचा : WhatsApp वर येणार नवीन फीचर्स, आता पेन ड्राईव्हमध्येही घेता येईल चॅट बॅकअप

इतर कंपन्याचे रिचार्ज प्लॅन  

 इतर कंपन्यांशी तुलना केल्यास, Reliance Jio तुम्हाला 479 रुपयांमध्ये 56 दिवसांची वैधता ऑफर करतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा देखील मिळतो. म्हणजेच यामध्ये एकूण डेटा 84 GB मिळेल, जो BSNL प्लॅनपेक्षा 28 GB ने कमी आहे. प्लॅनमध्ये कॉलिंग, SMS आणि जिओ ऍप्स सबस्क्रिप्शन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Airtel बद्दल बोलायचे झाले तर, या किंमतीच्या रेंजमध्ये 359 रुपयांचा प्लान आहे. ज्यामध्ये केवळ 28 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा मिळतो. म्हणजेच यात एकूण डेटा 56 GB मिळेल. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसोबतच 100 SMS आणि प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन फ्री ट्रायल सारखे फीचर्स दिले जात आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo