BSNL 91rs Plan: संपूर्ण तीन महिन्यांच्या वैधतेसह येईल कंपनीचा स्वस्त प्लॅन, मिळतील अनेक अप्रतिम बेनिफिट्स। Tech News
BSNL 100 रुपयांच्या अंतर्गत एक अप्रतिम प्लॅन सादर करते.
BSNL चा हा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह म्हणजेच संपूर्ण तीन महिन्यांसाठी येतो.
ज्यांना अधिक डेटा आणि कॉलिंगची गरज आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन विशेषत: चांगला आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL सातत्याने आपल्या वापरकर्त्यांना स्वस्त दरातील प्लॅन्समध्ये जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या की, कंपनी आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सच्या आधारे Jio आणि Airtel सारख्या खाजगी कंपन्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच Twitter वर स्वस्त STV प्लॅनची माहिती शेअर केली आहे. कंपनी 100 रुपयांच्या अंतर्गत एक अप्रतिम प्लॅन सादर करते.
Survey
तुम्ही BSNL चा दीर्घ वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम ठरेल. चला तर मग जाणून घेऊयात या प्लॅनची किंमत आणि बेनिफिट्स-
BSNL चा 91 रुपयांचा प्लॅन
BSNL चा हा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह म्हणजेच संपूर्ण तीन महिन्यांसाठी येतो. हा रिचार्ज प्लॅन मिळविण्यासाठी, तुम्हाला STV91 रुपये खर्च करावे लागतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्यांना अधिक डेटा आणि कॉलिंगची गरज आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन विशेषत: चांगला आहे. कंपनीने या प्लॅनबद्दल X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. पोस्ट तुम्ही खालीलप्रमाणे बघू शकता.
More validity, more convenience!
— BSNL India (@BSNLCorporate) February 8, 2024
Recharge with #STV91 and enjoy a generous 90-day validity. #RechargeNow: https://t.co/xdAExy3fzw#BSNL #ValidityBooster #BSNLRecharge pic.twitter.com/yTeYxm7ay7
प्लॅनमधील उपलब्ध बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी वापरकर्त्यांकडून 15 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाईल. याशिवाय, जर डेटासाठी तुम्हाला 1 पैसे प्रति MB म्हणजेच 1GB साठी 10.24 रुपये आकारले जातील. तसेच प्रति SMS 25 पैसे आकारले जाणार आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, BSNL कडे 90 दिवसांचा 499 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये कंपनी यूजर्सला 300SMS आणि फ्री कॉलिंग सुविधा देते. अशाप्रकारे BSNL तुम्हाला कमी किमतीत नेहमी अप्रतिम सुविधा देण्यासाठी नवनवीन प्लॅन्स आणि ऑफर्स आणत असते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile