BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि मोफत SMS, बघा किंमत

BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि मोफत SMS, बघा किंमत
HIGHLIGHTS

BSNL चे अतिशय स्वस्त प्लॅन, अमर्यादित कॉलिंग, टॉकटाइम आणि मोफत इंटरनेट उपलब्ध

BSNLचे स्वस्त प्लॅन 20 रुपयांपासून सुरू.

BSNL चा 87 रुपयांचा प्लॅन देशात सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध नाही.

भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच देशातील सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने Airtel-Jio आणि Vi ला टक्कर देण्याच्या उद्देशाने एक नवीन अत्यंत स्वस्त प्रीपेड प्लॅन लाँच केले आहे. युजर्सना हा प्लॅन सर्व सर्कलमध्ये मिळेल की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, काही सर्कलमध्ये हा प्लॅन नक्कीच उपलब्ध आहे. ज्यांना कमी किमतीत एका रिचार्ज प्लॅनमधून भरपूर फायदे हवे आहेत, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. हा प्लॅन BSNLने फक्त 87 रुपयांमध्ये सादर केला आहे. आता या प्लॅनचे वापरकर्त्यांना कसे फायदे मिळतील आणि हा प्लॅन Airtel-Vi-Jio च्या काही सर्वोत्तम प्लॅनला कसा टक्कर देईल हे जाणून घेऊयात.

BSNLचा 87 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन

 BSNL 87 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 14 दिवसांची वैधता आहे. याचा अर्थ तुम्हाला या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले सर्व फायदे फक्त 14 दिवसांसाठी मिळतील. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 1GB डेटा मिळतो, म्हणजेच तुम्हाला या प्लॅनसह एकूण 14GB डेटा ऑफर केला जात आहे. जर तुम्ही संपूर्ण दैनंदिन डेटा मर्यादा संपवली तर, इंटरनेट स्पीड फक्त 40Kbps पर्यंत खाली येणार आहे. त्याबरोबरच, BSNL प्लॅनसह, तुम्हाला दररोज 100 SMS देखील मिळतात. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल.

प्लॅन देशाच्या प्रत्येक सर्कलमध्ये उपलब्ध नाही 

वर नमूद केल्याप्रमाणे, देशातील प्रत्येक सर्कलमध्ये हे फायदे उपलब्ध होणार नाहीत. छत्तीसगड आणि आसाम यांसारख्या राज्यांमध्ये सध्या या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. 

हे सुद्धा वाचा : Big Boss OTT : करण कुंद्राने केले करण जोहरला रिप्लेस? प्रेयसी तेजस्वी प्रकाशबरोबर शोमध्ये एंट्री !

कोणत्या युजर्ससाठी प्लॅन सर्वोत्तम 

 या प्लॅनसह यूजर्सना 6.21 रुपयांच्या किमतीत 1GB डेटा मिळत आहे. व्हॉईस कॉलिंग, SMS आणि डेटा सेवांसाठी एकावेळी 100 रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊ इच्छित नसलेल्या वापरकर्त्यांसाठी हे प्लॅन सर्वोत्तम आहे. म्हणजेच ज्यांना कमी किमतीत अधिक फायदे हवे आहेत त्यांच्यासाठी ही योजना सर्वोत्तम आहे, असे म्हणता येईल. 

BSNL चा 18 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

BSNL तुम्हाला 18 रुपयांच्या कमी किमतीत देखील प्लॅन ऑफर करतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 2 दिवसांची वैधता मिळते. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 2GB डेटा देखील मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील देण्यात येत आहे.

BSNL चा 97 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

 BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा ऑफर केला जात आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला 18 दिवसांची वैधता देखील मिळेल. म्हणजेच यामध्ये तुम्हाला एकूण 36GB डेटा दिला जात आहे. त्याबरोबरच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील देण्यात येत आहेत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo